JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / केस धुतल्यानंतरही तेलकट वाटतात? डोक्यावरील चिकटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

केस धुतल्यानंतरही तेलकट वाटतात? डोक्यावरील चिकटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

जर तुम्हालाही हिवाळ्यात केसांची हीच समस्या जाणवत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही केसांमधील तेलकटपणा घालवू शकता. त्याने तुमचे केस जास्त सिल्की आणि फ्रेश राहण्यास मदत होईल.

जाहिरात

Haircare tips

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 ऑक्टोबर :  मुलींना आणि महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात, त्या केसांची विशेष काळजी घेतात. पण उन्हाळा असो वा हिवाळा, केस चिकट होणाची समस्या कायम सतावत असते. हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे, टाळूवर मोठ्या प्रमाणात सेबम तयार होतो, त्यामुळे केसांमध्ये तेल जास्त दिसून येतं. तुम्ही केस कितीही चांगले शॅम्पू केले असतील, तरीही दुसऱ्या दिवशी केसांमध्ये तेल दिसू लागतं. त्यात हिवाळ्यात आपल्याला रोज केस धुणं शक्य नसतं. त्यामुळे ते तसेच तेलकट दिसतात. जर तुम्हालाही हिवाळ्यात केसांची हीच समस्या जाणवत असेल तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही केसांमधील तेलकटपणा घालवू शकता. त्याने तुमचे केस जास्त सिल्की आणि फ्रेश राहण्यास मदत होईल. या संदर्भात ‘एनडीटीव्ही हिंदी’ने वृत्त दिलंय. अॅलोव्हेरा केसांमधील तेलकटपणा घालण्यासाठी अॅलोव्हेरा जेल उपयुक्त असतं. ते केसांसाठी खूप फायदेशीर आहे. एक चमचा अॅलोव्हेरा जेल, एक चमचा लिंबाचा रस आणि 2-3 चमचे शॅम्पू घ्या आणि तिन्ही गोष्टी मिक्स करा. हे मिश्रण लावून आठवड्यातून दोनदा केसं धुतल्यास केस चिकट दिसणार नाहीत. ब्लॅक टी एक कप पाणी घ्या आणि त्यात ब्लॅक टी टाकून उकळून घ्या. नंतर ते गाळून घ्या व थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर त्याने केस धुवा आणि ते केसांमध्ये लावून 20 मिनिटं ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. हेही वाचा - ‘हे’ घरगुती उपाय केलेत तर पिवळे दात होतील पांढरे शुभ्र टोमॅटो केसांमधील जादा तेल काढून टाकण्यासाठी टोमॅटोचा मास्क बनवून लावता येऊ शकतो. या मास्कमुळे स्कॅल्पचा पीएच लेव्हल मेंटेन ठेवता येते. एक चमचा मुलतानी माती घेऊन एक टोमॅटो बारीक करून मिक्स करा आणि तो मास्क डोक्याला लावा, नंतर 20 ते 25 मिनिटांसाठी हा मास्क केसांवर ठेवा आणि नंतर केस चांगले धुवा. हे आठवड्यातून दोनदा केल्यास केस सिल्की दिसू लागतील. दही एक कप दही आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं यांचं मिश्रण मिक्सरमधून काढा. ही पेस्ट अर्धा तास केसांमध्ये लावून ठेवा आणि नंतर केस धुवून घ्या. यामुळे केसांमधील तेलकटपणा निघून जाईल आणि केसांमधून डँड्रफही निघून जाईल. अॅपल सीडर व्हिनेगर एक कप पाण्यात 2 चमचे अॅपल सीडर व्हिनेगर मिक्स करा. केस धुताना हे पाणी डोक्यावर टाका आणि 5 ते 10 मिनिटे ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केसांमधील चिकटपणा दूर होतो. केसांमधील तेलकटपणा घालवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, या घरगुती पद्धती वापरून तुम्ही केसांचे आरोग्य सुधारू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या