JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Skin Care : महागडे उपचार न घेतादेखील मिळू शकते टाईट स्किन, करा हे घरगुती उपाय

Skin Care : महागडे उपचार न घेतादेखील मिळू शकते टाईट स्किन, करा हे घरगुती उपाय

वाढत्या वयानुसार त्वचेमधील कनेक्टिंग टिशूज कमी होऊ लागतात ज्यामुळे त्वचा सैल होऊ लागते. त्याचबरोबर जास्त काळ उन्हामध्ये राहणे, मेकअप करणे, असंतुलित आहार, त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणे (Home Remedies For Tight Skin). अशा काही कारणांमुळे त्वचा सैल होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै : आपण कोणत्याही वयाचे असू मात्र तरीही आपण सुंदर आणि तरुण दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. कधी पार्लरमध्ये जाऊन आपण महागडे उपचार घेतो (Get Tight Skin Without Expensive Treatment) किंवा कधी घरगुती उपचार करून त्वचेची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतो. मात्र वयानुसार आणि इतर अनेक आपल्याला हवी तशी सुंदर त्वचा मिळत नाही किंवा ती तशीच टिकून राहत नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणं आणि त्वचा सैल होणं. याची अनेक कारण असतात. वाढत्या वयानुसार त्वचेमधील कनेक्टिंग टिशूज कमी होऊ लागतात ज्यामुळे त्वचा सैल होऊ लागते. त्याचबरोबर जास्त काळ उन्हामध्ये राहणे, मेकअप करणे, असंतुलित आहार, त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणे. अशा काही कारणांमुळे त्वचा सैल होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात.

Blood Sugar Level : बेसन रोटीचे अनेक फायदे; ब्लड शुगर पातळी राहील नियंत्रणात

संबंधित बातम्या

तुमची स्किन टाईट करण्यासाठी आज आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत (Home Remedies For Tight Skin). सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्या घरातच उपलब्ध असलेल्या काही तेलांचा तुम्ही उपयोग करू शकता. जसे की, खोबरेल तेल. तुमची त्वचा टाईट करण्यासाठी आठवड्यातून दोनदा खोबरेल तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा. ही प्रक्रिया अंघोळ करण्याच्या एका तासापूर्वी करावी. यामुळे स्किनमध्ये असणाऱ्या कोलायजनचे प्रमाण वाढते आणि तुमची स्किन टाईट होण्यास मदत होते. खोबरेल तेलाप्रमाणेच बदामाच्या ललनेही अंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास अगोदर मालिश करावी. याचादेखील स्किनला खूप फायदा होतो. स्किन टाईट करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन ई ऑईल आणि व्हिटॅमिन ई युक्त फिश ऑईलचा वापरदेखील करू शकता. यासाठी हे ऑईल सुरत्या असलेल्या भागावर रात्रभर लावून ठेवावे आणि सकाळी उठल्यावर स्वच्छ अंघोळ करून ते धुवून टाकावे. याचादेखील तुमच्या त्वचेला खूप फायदा होतो. त्यासोबतच तुम्ही चेहऱ्यावर मुलतानी माती, एग व्हाईट, कॉफी पावडरचा मास्क बनवून लावू शकता. हे मास्कदेखील तुमच्या त्वचेला टाईट होण्यासाठी मदत करतील. मासे खाल्ल्याने त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो? नवीन संशोधन काय सांगतंय पाहा त्वचा बाहेरून सुंदर बनवण्यासाठी तिला यातूनही तितकेच पोषण मिळणे गरजेचे असते. यासाठी तुमचा आहार योग्य आणि संतुलित असला पाहिजे. त्वचा टाईट बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ग्रीन टी, केळी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सीयुक्त असलेली फळे यंफहा समावेश करू शकता. मासांहारी लोक यासोबत अंडी आणि मांसाहारदेखील समाविष्ट करू शकतात. यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन मिळते आणि ते तुमच्या त्वचेला टाईट होण्यास मदत करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या