JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Naukasana or Boat Pose: रोज फक्त 15 मिनिटं करा हे आसन; सुटलेलं पोट होईल कमी

Naukasana or Boat Pose: रोज फक्त 15 मिनिटं करा हे आसन; सुटलेलं पोट होईल कमी

नौकासन ( benefits of boat pose or naukasana) शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त मानले जाते. त्याच्या नियमित सरावाने, आपल्या पोटाची चरबी कमी होते आणि पाठीचा कणा देखील मजबूत होतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 सप्टेंबर : योग (Yoga) करणं निरोगी आयुष्यासाठी गरजेच आहे. नियमित योग  (Yoga poses)  केल्यानं आपण अनेक आजार टाळू शकतो (Benefits of yoga). योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत, त्यातील एक म्हणजे नौकासन. नौकासन (Benefits of boat pose or naukasana) शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त मानले जाते. त्याच्या नियमित सरावाने, आपल्या पोटाची चरबी कमी होते आणि पाठीचा कणा देखील मजबूत होतो. नौकासन हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून बनलेला आहे. नौका म्हणजे बोट आणि आसन म्हणजे आसन. या योगासनामध्ये आपले शरीर बोटीच्या स्थितीत होते. हे आसन एक मध्यम दर्जाचे योग आसन आहे, जे प्राचीन काळापासून चालू आहे. नौकासनाला इंग्रजीत बोट पोज म्हणतात. सुरुवातीला त्याचा सराव करण्यात थोडी अडचण येऊ शकते, परंतु दैनंदिन सरावाने आपण सहजपणे त्याचा सराव करू शकता. नौकासन करण्याची पद्धत - सर्वप्रथम, एका सपाट जागेवर योगा मॅटवर झोपा. आता दोन्ही पाय एकत्र ठेवा आणि हात शरीराच्या जवळ ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना हात, पाय, छाती, डोके वर घ्यावे. हात आणि पाय सरळ ठेवा आणि गुडघे वाकवू नका. पाय इतके वरती घ्या की जोपर्यंत तुम्हाला पोटात ताण जाणवत नाही. नितंबांवर संपूर्ण शरीराचे वजन संतुलित करण्याचा प्रयत्न करा. V च्या आकारात सुमारे 10 ते 20 सेकंद धरून ठेवा. यानंतर, हळूहळू श्वास बाहेर काढा आणि सामान्य स्थितीत परत या. हे आसन तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटे करू शकता. हे वाचा -  Health Tips : व्यायाम करताना जास्त घाम निघणे ठरू शकते धोकादायक? बोट पोज किंवा नौकासनाचे फायदे दररोज नौकासनाचा सराव केल्यास तुमचे पोट आणि बाजूची चरबी कमी होते. नौकासनमुळे तुमचे ओटीपोट आणि बाजूचे स्नायू ताणलेले असतात, जे तुम्हाला वजन कमी करण्यास देखील मदत करतात. तुमच्या हॅमस्ट्रिंग स्नायूंसाठी नौकासनाचा रोजचा सराव खूप उपयुक्त आहे. त्याच्या सरावाने, आपण हॅमस्ट्रिंग क्रॅम्पच्या समस्येमध्ये देखील आराम मिळवू शकता. नौकासनाचा सराव ओटीपोटाचे स्नायू टोन आणि बळकट करण्याचे काम करतो. या आसनाचा सराव अॅब्स बनवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. नौकासन किंवा बोट पोझचा सराव मणक्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याच्या नियमित सरावाने, आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. हे वाचा -  तब्बल 22 हजार खर्च करून कापले केस पण…; Haircut पाहताच ढसाढसा रडू लागली तरुणी; VIDEO VIRAL नौकासन करताना ही खबरदारी ठेवा हे आसन गर्भधारणा आणि मासिक पाळी दरम्यान करू नये. जर पोटाशी संबंधित कोणत्याही ऑपरेशनला जास्त वेळ झाला नसेल तर नौकासन करू नका. दमा आणि हृदयाच्या रुग्णांनीही त्याचा सराव करू नये. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या