JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त 40 मिनिटांत हेल्दी व्हाल; नियमित 'ही' कामं करा

फक्त 40 मिनिटांत हेल्दी व्हाल; नियमित 'ही' कामं करा

फक्त 40 मिनिटं स्वतःसाठी काढल्यानं आपलं शरीर स्वस्थ बनू शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

व्यस्त वेळापत्रकामुळे स्वत:साठी वेळ काढणं कठीण झालं आहे. वेळेअभावी लोक स्वत:ची काळजी घेण्यात असमर्थ आहेत. हेच कारण आहे की शारीरिक व्यायामाच्या अभावी बर्‍याच रोगांना शरीर बळी पडत आहे. इतर कामासह स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणंदेखील महत्त्वाचं आहे. बरेच लोक तंदुरुस्त राहण्यासाठी जिममध्ये जातात, पण काही दिवसांनी व्यायामशाळेत नियमितपणे जाणं त्यांना जमत नाही. पण सकाळी केवळ 40 मिनिटं स्वतःसाठी काढल्यानं आपलं शरीर स्वस्थ बनू शकतं. यासाठी नियमित दिनक्रम कायम ठेवला पाहिजे. या 40 मिनिटांत स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काय करता येईल ते जाणून घेऊया- सकाळी सूर्यनमस्कार करा सूर्यनमस्कारात एकूण 12 आसने आहेत, जी केवळ 15 मिनिटांत करता येतात. हे नियमित केल्यास आरोग्यामध्ये सुधारणा होईल. myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, सूर्यनमस्कार शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करतात, जेणेकरून आपण आपली सर्व कामं मन लावून करू शकू. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार केल्यानं सूर्यप्रकाशाचा देखील पुरवठा होतो, ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. सूर्यनमस्काराची सर्व आसनं खूप फायदेशीर आहेत, ते शरीरात लवचिकता आणतात. जर शरीरात लवचिकता आहे, याचाच अर्थ शरीरात चरबी कमी आहे. चरबी वाढणं हे शरीरातील बहुतेक रोगांचे मुख्य कारण बनतं. स्वत**:**ला पाच मिनिटं विश्रांती द्या सकाळच्या व्यायामानंतर काही काळ शरीराला आराम द्या. त्यासाठी थोडा वेळ आवडतं संगीत ऐका किंवा सकारात्मक गोष्टींचा विचार करा. यामुळे मेंदूला आराम मिळतो. याशिवाय काही वेळ ध्यानस्थ व्हा किंवा प्राणायाम देखील करू शकता. संध्याकाळचा दिनक्रम कसा असावा आरोग्यासाठी, संध्याकाळचे जेवण हे रात्री 7 च्या आधी करणं महत्त्वाचं आहे, यामुळे पचन चांगले होईल. रात्रीच्या जेवणानंतर 15 ते 20 मिनिटं चालत जा. यामुळे जेवणही पचेल आणि जास्तीचं अन्न चरबीच्या रुपात साठलं जाणार नाही. रात्रीचं जेवण अतिशय हलकंफुलकं असावं कारण रात्री शारीरिक क्रिया कमी होतात. संध्याकाळी हे देखील लक्षात घ्यावं की, संध्याकाळी 6 नंतर पाणी पिणं थांबवावं जेणेकरून रात्री झोपताना पुन्हा पुन्हा लघवी येण्याची समस्या उद्भवणार नाही. कारण या मुळे अपूर्ण झोपेचा त्रास होतो. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपावं जर आपल्याला सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा असेल तर आपण रात्री लवकर झोपणंदेखील महत्त्वाचं आहे. नित्यक्रम बदलणं सुरुवातीला त्रासदायक ठरू शकते, पण काही दिवसात आपल्या शरीराची सर्कडियन घड्याळ आपोआपच आपल्याला सकाळी उठवू लागते. सूर्योदयावेळी जाग येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी व्यायाम करणं अधिक फायदेशीर आहे. दररोज प्राणायाम आणि योग करावा myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते प्राणायाम केल्यानं मन आणि मेंदू ताजेतवाने राहतात आणि शरीरात नवी ऊर्जा संक्रमित होते. या व्यतिरिक्त प्राणायाम केल्यानं मानसिक शांततेचा अनुभव होतो. अनुलोम-विलोम, कपालभाति, भ्रामरी यासारखे प्राणायाम केले पाहिजेत, ज्याने फुफ्फुसं निरोगी राहतात. योगासाठी किमान 40 मिनिटं घ्या. योग केल्याने शरीरातील रक्ताभिसरण गुळगुळीत होते आणि शरीर लवचिक राहतं. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - निरोगी राहण्याच्या टिप्स न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या