JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health tips : खूप हेअर फॉल होतोय? या उपायाने होईल फायदा

Health tips : खूप हेअर फॉल होतोय? या उपायाने होईल फायदा

सर्वांनाच वाटतं आपले केस घनदाट असावेत. पण आजच्या लाईफ स्टाईलमुळे (Lifestyle) केस गळतीची समस्या (Hairfall Problem) वाढत चालेली आहे. वाढते प्रदुषण, बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी (Habits),स्ट्रेस, यामुळे केस पांढरे होणे,गळणे,तुडणे अशा समस्या वाढायला लागल्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Morning Hair Care Tips : सर्वांनाच वाटतं आपले केस घनदाट असावेत. पण आजच्या लाईफ्स्टाईलमुळे (Lifestyle) केस गळतीची समस्या (Hairfall Problem)  वाढत चालेली आहे. वाढते प्रदुषण, बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी (Habits),स्ट्रेस, यामुळे केस पांढरे होणे, गळणे, तुडणे अशा समस्या वाढायला लागल्या. केसांच्या समस्येची अनेक कारणं असू शकातात. पित्त दोष, अनुवांशिक कारणं, अधिक प्रमाणात केमिकल्सचा उपयोग, हार्मोनल प्रॉब्लेम. मेडिकल प्रॉब्लेम्समुळे घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या साईडइफेक्टमुळे केस गळत असतील. तर काही छोटेबदल करुन तुम्ही केसांच्या समस्येतुन (Hair Problems)  सुटका करु शकता. त्यासाठी फक्त सकाळच्या काही सवयी(Morning Habits) बदलाव्या लागती.

हेअर फॉलवर प्रभावी उपाय

  1. सीव्हीटॅमीयुक्त आवळा

आवळा केस सफेद होण्याच्या समस्येवर एक रामबाण उपाय आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी, झिंक आणि आयर्न असतं. आवळ्यातलं ‘फाइटो न्‍यूट्रिएंट्स, एंटीऑक्सीडेंट’ फ्री-रेडिकल्सची समस्या संपवतं. त्याने केस मजबुत होतात. आवळ्यातले व्हिटॅमिन, आयर्न केस हेल्दी बनवतात. सकाळी उपाशीपोटी दोन चमचे आवळा रस पाण्यात मिसळुन प्यायल्याने काहीच दिवसात फायदा मिळतो.

  1. टी ट्री ऑईल

दोन टमचे टी ट्री ऑईल चार चमचे कोमट पाण्यात मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. 10 मिनटं हलक्या हातांना मसाज करा आणि वीस मिनिटांनंतर धुवा. काही दिवस सकाळी केस धुण्याआधी हा उपाय करत राहिल्यास केसांची त्वचा डिटॉक्स होऊन केस वाढतील.

  1. वर्काऊटने करा स्ट्रेस कमी.

स्ट्रेस शरीर,मन आणि केसांचा सर्वात मोठा शत्रु आहे. सकाळच्या वेळी एक्सरसाइज आणि जॉगिंग केल्याने स्ट्रेस कमी होतो. मॉर्निंग वर्काऊटमुळे आरोग्यही सुधारते आणि केसंही मजबुत होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या