व्यायाम केल्याने शरीराचं तापमान वाढतं. त्यामुळे जिमनंतर पातळ कपडे घालू नका. नाहीतर, व्हायरस इन्फेक्शन होऊ शकतं.
दिल्ली, 8 जून : चांगल्या आरोग्यासाठी (Health) उत्तम आहार आणि व्यायाम**(Exercise)महत्त्वाचा आहे. चांगला आहार असेल तर, रोग आपल्या जवळ येतच नाहीत. मानसिक(Metal)आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवायचं असेल तर, दररोज व्यायाम करायला हवा. वजन वाढलं (Weight Gain)असेल, हाडं दुखत(Bone Pin) असतील किंवा इतर कोणते त्रास असतील तर दररोज व्यायाम करायला हवा. यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) देखील वाढते. व्यायाम किती वेळ करावा आणि केव्हा करावा याबद्दल अनेक संशोधन(Research)**झालेले आहेत. खरंतर सकाळच्या वेळी व्यायाम (Exercise in the **M**orning) करण्याचा सल्ला दिला जातो सकाळच्या वेळी वातावरण आल्हाददायक असतं. त्यामुळे व्यायाम केल्यामुळे मूड आणखीन चांगला होतो आणि जास्त फायदा मिळतो. मात्र,या संदर्भामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये (Australia)एक संशोधन करण्यात आलं आहे.या संदर्भात अमर उजाला मध्ये माहिती देण्यात आली आहे. ( Mucormycosis हा Black Fungus मुळे नव्हे; तज्ज्ञांनी सांगितलं आजाराचं नेमकं कारण ) काय सांगतं संशोधन? त्यानुसार सकाळी नाही तर,संध्याकाळी व्यायाम **(Evening exercise)**केल्यास जास्त फायदे मिळतात. संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ (Metabolic Health) सुधारते, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात येते आणि बरेच आजार कमी होतात. असा दावा करण्यात आलेला आहे. याच संशोधनाने सकाळी व्यायाम करण्यामुळे मेटॅबोलिक हेल्थमध्ये कोणताच फरक पडला नसल्याचा दावा करण्यात आला. तर, संध्याकाळी एक्ससाइज केल्याने मेटाबोलिक हेल्थमध्ये फरक दिसून आला. ( परदेशी कोरोना लशींचं भारतात लोकल ट्रायल रद्द झाल्याने काय फायदा होणार? ) आपण जे खातो ते पचल्यानंतर शरीरात ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया होते. त्याला मेटाबोलिजम म्हणतात.ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलेलं हे संशोधन केवळ करण्यात आलेलं आहे. चरबीयुक्त आहार घेणाऱ्या पुरुषांवर हे संशोधन करण्यात आलं. संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे संध्याकाळी व्यायाम केल्यामुळे मेटाबोलिक हेल्थ चांगली राहते, ब्लड शुगर लेव्हल आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं, ब्लडप्रेशरचा त्रास कमी होतो. याशिवाय वजन कमी होण्यास देखील मदत होते. शांत झोप लागते, हार्ट पेशंटला संध्याकाळी व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.