मुंबई, 9 जुलै : महिला अनेक कामं एकाचवेळी करतात. स्वतःचं करिअर बनवणं असो किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं असो. त्या नेहमीच सगळीकडे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. कदाचित याच कारणामुळे लोकांना स्त्रियांचे (Working Women) असे बेहिशेबी काम करणे सामान्य वाटते. महिलांबद्दल बोलायचे झाले तर त्यांनादेखील व्यवसायात आणि वैयक्तिक आयुष्यात (Personal And Professional Life) मागे पडण्याची भीती असते. कदाचित त्यामुळेच महिला स्वत:चा थकवा आणि त्रासाकडे दुर्लक्ष (Women Health Problems) करून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. या सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे महिलांना शारीरिक थकवा तर येतोच, पण त्यांना मानसिक थकवाही (Women Mental Health) सहन करावा लागतो. हे त्यांना अशक्त आणि आजारी बनवते. हीच परिस्थिती गंभीर होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला, एक वर्किंग वुमन असतानाही तुम्ही तुमचे वैयक्तिक जीवन सुधारून आनंदी कसे राहू शकता यासाठी काही टिप्स देणार आहोत. प्रत्येक कामाला तुमची एकटीची जबाबदारी मानू नका वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन भिन्न गोष्टी आहेत. यामध्ये समतोल निर्माण करण्यासाठी तुम्ही दोघांमध्ये प्राधान्यक्रम ठरवणे आवश्यक आहे. घरातील काही कामे, जी इतर लोक करू शकतात. त्या जबाबदाऱ्या दुसऱ्यावर सोपवा (Divide The Work). यामुळे तुम्ही काही प्रमाणात स्वतःसाठी वेळ काढू शकाल आणि ऑफिसमध्ये काम करताना घराची चिंता वाटणार नाही.
मूतखडा ते कॅन्सर, अनेक आजारांवर रामबाण उपाय; या वनस्पतीसाठी बियांचीही लागत नाही गरज‘मी टाईम’कडे दुर्लक्ष करू नका ग्रेटिस्टच्या मते, जेव्हा तुम्ही स्वतःसाठी ‘मी टाईम’ काढाल (Take Me Time) तेव्हाच तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले व्यवस्थापन करू शकाल. या दरम्यान तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या आणि स्वतःला आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या आनंदी आणि स्थिर वाटत असेल तर दोन्ही जीवनातील समन्वय सुधारेल. तुमच्या आवडीचे काम करा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करायची असेल. तर तुमच्या आवडीची नोकरी शोधा. यामुळे तुम्हाला कामाचा ताण कमी होईल (Do Your Favorite Work) आणि त्यात जास्त आनंद मिळेल. यासोबतच तुमचे काम सोपे होत जाईल. त्याचबरोबर व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन निर्माण करण्यासाठी तुम्हाला कोणतेही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. सीमा निश्चित करणे महत्वाचे आहे जर तुम्हाला काम आणि वैयक्तिक जीवनात आनंदी रहायचे असेल तर दोन्हीसाठी सीमा (Decide Boundary For Work) निश्चित करा. कार्यालयीन वेळेनंतर कार्यालयीन काम करू नका किंवा काम करताना घरच्या काळजीत बुडून जाऊ नका. या सवयींमुळे आपली मानसिक शांती संपुष्टात येते.
शारीरिक संबंधांनंतर लघवी केल्याने प्रेग्नन्सी टाळता येते का?जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मदतीसाठी विचारा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील समन्वयात समस्या आल्यास, सहकारी किंवा कुटुंबातील सदस्यांकडून मदत मागायला (Take Others Help) अजिबात संकोच करू नका. मदत घेऊन तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती देऊ शकाल, जे चांगल्या कामासाठी आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनासाठी आवश्यक आहे.