मुंबई, 26 फेब्रुवारी : कोरोनाच्या साथीनं केवळ लोकांच्या जगण्याची पद्धतच बदलली असं नाही, तर त्यांच्या कामाचीही पद्धत यात बदलली आहे. कोरोनानं जणू सांगितलं, की जे काम ऑफिसातून होत असे ते घरूनही होऊ शकतं. याच कारणानं कोरोनाकाळात (corona times) ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) हा शब्द बराच चर्चेत आला. कोरोनामुळं जेव्हा चहूबाजूंना लॉकडाऊन लागला होता तेव्हा कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केला. यादरम्यान सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे आहेत. कुणाला या वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आला आहे तर कुणाला हे खूप चांगलं वाटतं आहे. आता वर्क फ्रॉम होमचा असा व्हिडिओ व्हायरल (work from home viral video) झाला आहे जो लोकांना केवळ आवडतो आहे असं नाही तर तो पाहून लोक एकदमच इमोशनल होत (work from home emotional video) आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान एक वडील आपल्या लाडक्या मुलीला खूप चवदार पदार्थ बनवून खाऊ घालताना (Father making tasty dishes for daughter video) दिसतात. हा व्हिडिओ पाहून लोक त्या वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर एका @sarsouura या ट्विटर युजरनं वडिलांचा व्हिडिओ आपल्या टाईमलाईनवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भारावून गेले आहेत. या व्हिडिओत असं दाखवलं गेलं आहे, की @sarsouura आपल्या वर्क फ्रॉम होममध्ये गुंतलेली असताना मुलीचे वडील तिला विविध चमचमीत पदार्थ बनवून खाऊ घालत आहेत. हे पाहून ती मुलगी कमालीची आनंदून जाते.
हा व्हिडिओ सर्वात आधी टिकटॉकवर (work from home tik-tok video) बनवला गेला. नंतर तो ट्विटरवर शेअर केला गेला. यासोबतच एक सुंदर कॅप्शनही दिलेली आहे. ‘पप्पांच्या आशिर्वादासह घरून काम’ असं या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. या पोस्टवर लोक मनापासून व्यक्त होत आहेत. अनेकजण हळवेही होत आहेत. हेही वाचा धम्माल VIDEO: ‘पावरी किधर हो रही है’, पोलीसच विचारतायत हा प्रश्न! एका युजरनं लिहिलं आहे, ‘हा व्हिडिओ पाहून मला खूप रडायला आलं.’ एकानं लिहिलं, ‘मला अशाच वडिलांची गरज आहे. हे वडील मला दत्तक घेतील का?’