Best Vadapav in Pune: टेस्टी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध वडापाव सेंटरवर ग्राहकांची उडते झुंबड, पाहा लिस्ट
पुणे, 23 ऑगस्ट: अलीकडच्या काळात जीवन खूप गतिमान झालंय. जसजसा विकास होतोय, तसं जगणंही गतिमान होतंय. इतकं की लोकांना नीट जेवायलाही वेळ मिळेना झालाय, यामुळंच फास्टफूड संस्कृती सर्वत्र चांगलीच रुजलीय. बर्गर, पिझ्झा, चायनीज फूड, तसेच साऊथ इंडियन फूड आता आपल्याला सर्वत्र पोहोचल्याचं दिसतं. महाराष्ट्रामध्येही फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. महाराष्ट्रात कितीही फास्टफूड आली तरी एका पदार्थाची बादशाहत कधीच संपत नाही, तो पदार्थ म्हणजे वडापाव… वडापाव हे नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. तुम्हाला महाराष्ट्रातील गावागावातील छोट्यात छोट्या गावामध्येही वडापाव खायला मिळतो. वडापाव जसा खायला टेस्टी, तसाच तो खिशाला परवडणाराही…अनेकजण तर अडचणीच्या काळात फक्त वडापाव खाऊनही दिवस काढतात. त्यामुळं महाराष्ट्रात तरी वडापाव म्हणजे नंबर वन फास्टफूड म्हणायला हरकत नाही. पुण्यामध्येही अनेक प्रसिद्ध वडापाव सेंटर आहेत. या वडापाव सेंटरवर पुणेकरांची झुंबड उडालेली असते. आज आपण जाणून घेऊया पुण्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटरची (Best Vadapav in Pune) माहिती घेणार आहोत. 1. जोशी वडेवाले- पत्ता- सर्व्हे क्रमांक-1281, बालगंधर्व रंग मंदिर, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, पुणे-411005 फोन-7719975556 2. अन्नपूर्णा स्न्रक्स सेंटर पत्ता-तपकिर गल्ली बुधवार पेठ, पुणे- 411002 फोन- 8554865146 3. श्रीकृष्ण वडापाव पत्ता- 500, सुवर्ण गंगा अपार्टमेंट, नारायण पेठ, बुधवार पेठ, पुणे, 411002 फोन- 7094240105 4. गोली वडापाव सेंटर पत्ता-शॉप नंबर 302, जैन मंदिराजवळ, सोमवार पेठ, पुणे-411002 फोन-992105090 5. एस कुमार वडेवाले जोगेश्वरी मंदिराजवळ, अप्पा बळवंत चौक, बुधवार पेठ पुणे-411002 फोन-8446605115