तुम्ही काय खाता यावर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य अवलंबून आहे.
मुंबई, 27 जुलै: डोळ्यांची (Eye) पापणी न हलवता एकमेकांकडे किंवा एखाद्या ठिकाणी पाहत राहणं, हा खेळ तर तुम्ही नक्कीच खेळला असाल. हा खेळ जिंकल्यावर माझेच डोळे स्ट्राँग (Eye health) आहे, असं तुम्ही अभिमानाने म्हणालासुद्धा असाल. पण आता मात्र तुम्हाला डोळ्यांच्या बऱ्याच समस्या (Eye problem) उद्भवत आहे. डोळे दुखू लागले, लाल झाले किंवा डोळ्यांच्या (Eye care) इतर कोणत्या समस्या असतील तर बहुतेक जण डोळे तपासण्याचा (Eye test) सल्ला देतात. तुला चष्मा लागला असेल असं सांगतात. पण आपण मात्र मला काही चष्मा वगैरे लागला नाही असं म्हणून सरळ आपले डोळे हेल्दी असल्यावरच शिक्कामोर्तब करतो. पण खरंच तुम्हाला वाटतं तसं तुमचे डोळे हेल्दी आहेत का? आता तुमचे डोळे किती हेल्दी किंवा निरोगी आहे, हे तपासायाचं असेल तर साहजिक तुम्ही समोरची वस्तू तुम्हाला स्पष्ट दिसते आहे. किती दूरपर्यंतचं तुम्हाला दिसते, यावरून समजतं. पण दूर म्हणजे किती दूरपर्यंत दिसणं म्हणजे तुमची दृष्टी चांगली याचा अंदाज तर तुम्ही स्वतः लावू शकत नाही आणि ते नेमकं समजून घ्यायचं तर मग तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊनच तपासणी करावी लागेल. हे वाचा - तजेलदार त्वचेसाठी 5 हेल्दी ड्रिंक्स पिऊन बघा; Cosmetics वापरणंही बंद कराल पण आता टेन्शन घेऊ नका. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे न जाता अगदी घरच्या घरीही तुम्ही तुमच्या डोळ्यांची तपासणी करू शकता. घरबसल्या करता येईल अशी एक सोपी आय टेस्ट तुमच्यासाठी. यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही. तर फक्त एक फोटो पाहायचा आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटवर हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोत दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील नेत्ररोग तज्ज्ञांनी ही डोळ्यांची छोटीशी सोपी चाचणी विकसित केली आहे. आता तुम्ही ही चाचणी नेमकी करायची कशी? याची माहितीसुद्धा यात दिलेली आहे. तुम्हाला करायचं काय आहे, तर तुम्हाला यात एक फोटो दिसतो आहे. ज्यात एक लाल रंगाचा मोठा वर्तुळ दिसतो आहे आणि त्यात पुसटसा एक दोनअंकी आकडा दिसतो आहे. या वर्तुळातील आकड्याकडे नीट पाहा. हे वाचा - चुकूनही जवळ जाऊ नका या झाडाजवळ; इतकं विषारी की हात लागला तरी तडफड होत राहील जर तुम्हाला 88 असं दिसलं तर मग तुमच्या डाव्या डोळ्याची दृष्टी कमजोर आहे. 83 दिसलं तर तुमच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमजोर आहे. 33 दिसलं तर तुमच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमजोर आहे, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि जर तुम्हाला 38 दिसलं तर मग मात्र तुमचे डोळे उत्तम, निरोगी आहे. तुमच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी चांगली आहे. कारण या वर्तुळातील योग्य संख्या ही 38 आहे.