प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 24 डिसेंबर : सुखी वैवाहिक जीवनासाठी विश्वास आणि निष्ठा खूप महत्त्वाची असते; पण काही वेळा काही कारणांमुळे वैवाहिक जोडीदाराची फसवणूक करून ‘तो’ किंवा ‘ती’ लग्नानंतरही कोणाशी तरी अफेअर करतात. लग्नानंतर पती किंवा पत्नी बाहेर अफेअर का करतात, यामागे काय कारणं असू शकतात, याबाबत थोडी माहिती घेऊया. लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याला हे माहिती असणं खूप फायद्याचं ठरू शकतं. झी न्यूज हिंदी ने याबाबतचं वृत्त दिलंय. लग्न हे एक अतिशय पवित्र नातं आहे. जेव्हा दोन व्यक्ती विवाहबंधनात बांधल्या जातात, तेव्हा त्या एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची, एकमेकांशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतात. आजच्या काळात लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज, अशी अनेक प्रकरणं समोर येतात, ज्यामध्ये पती किंवा पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर सुरू असतं; पण अशी अफेअर का सुरू होतात, याची काही कारणं जाणून घेऊया. सायबर अफेअर सायबर अफेअर हे आधुनिक प्रकारचं अफेअर आहे. आजच्या डिजिटल युगात अनेक जण याला बळी पडतात. काही वेळा यामध्ये फसवणूक होते. येथे अफेअरच्या नावाखाली अनेकदा लुटलं जातं. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला त्याच्या ओळखीच्या व्यक्ती अशा अफेरला बळी पाडतात. बहुतांश प्रकरणात असं दिसून येतं, की हे रिलेशन इमोशनल किंवा सेक्शुअल असतं. दिवसेंदिवस अशा अफेअरचे प्रमाण वाढत असल्यानं सतर्क राहायला हवं. रोमँटिक अफेअर्स आजच्या काळात जीवनशैली खूप बदलली आहे. अशा परिस्थितीत रोमँटिक अफेअर हा प्रकार वाढतोय. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या जोडीदाराव्यतिरिक्त इतर व्यक्तीशी जोडली जाते, तेव्हा अशी प्रकरणं समोर येतात. या नात्याची सुरुवात मैत्रीपासून होते; पण हळूहळू त्याचं रूपांतर प्रेमात होतं. पुढे नातं अशा टप्प्यावर पोहोचतं, की हे प्रेमसंबंध संपवणं खूप कठीण होऊन बसतं. सेक्स अॅडिक्ट असणं अनेक जण सेक्स अॅडिक्ट असतात. अशा व्यक्तींना सेक्सचं व्यसन असतं. त्यांचा त्यांच्या जोडीदाराशी कोणताही भावनिक संबंध नसतो. हे अफेअर अशा व्यक्तींच्या बाबतीत घडतं, जे त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी नाहीत व त्यामुळे ते त्यांच्या पत्नीची फसवणूक करतात. हे वाचा - धर्म ठरतोय नवरा बायकोंमधील दुराव्याचं कारण? वाढत्या घटस्फोटांची धक्कादायक माहिती जुन्या प्रेमाची आठवण एखाद्या व्यक्तीला सध्याच्या विवाहित जीवनात प्रेमाची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत आयुष्याचा जोडीदार निवडण्यात स्वतःची चूक झाली आहे, असं त्याला वाटत असतं. अशा व्यक्तींना दुसऱ्याशी प्रेमसंबंध निर्माण करायचे असतात. ही रिलेशन इमोशनल किंवा सेक्शुअल अशा दोन्ही प्रकारची असतात. अशा परिस्थितीत पत्नीनं किंवा पतीनं अशी रिलेशनशिप तयार होण्यापासून जोडीदाराला वाचवलं पाहिजे. यासाठी तिनं तिच्या पतीशी या विषयावर खुलेपणानं बोललं पाहिजे. हे वाचा - असं ओळखा दोघांचं नातं आता मॅच्युअर झालंय; लग्नाचा विचार करायला हरकत नाही विवाहबाह्य संबंध असल्याची अनेक प्रकरणं अलीकडे समोर येतात. यातून अनेकदा मोठे गुन्हेही घडतात. त्यामुळे पती-पत्नी या दोघांनी वेळीच सावध होऊन स्वतःचा जोडीदार हा विवाहबाह्य संबंध ठेवणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे.