JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Everyday Habits: या 6 सवयींमुळे वय वाढण्याची क्रिया होते जलद, आताच बदला!

Everyday Habits: या 6 सवयींमुळे वय वाढण्याची क्रिया होते जलद, आताच बदला!

दिवसभर कामाच्या व्यापामुळे लोकांना आरोग्यकडं लक्ष देणं अशक्य होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 जुलै : बदलती जीवनशैली (Lifestyle), व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या आहाराचा परिणाम आरोग्यावर (Health) होताना दिसत आहे. या गोष्टींमुळे लोकांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. दिवसभर कामाच्या व्यापामुळे लोकांना आरोग्यकडं लक्ष देणं अशक्य होत आहे. तसंच छंद, पर्यटन, सण-समारंभ अशा आवडत्या गोष्टींनाही पुरेसा वेळ देता येत नसल्याचं चित्र आहे. या गोष्टींमुळे एकीकडे आरोग्यावर परिणाम होत असताना, दुसरीकडे वय वेगाने वाढण्याची (Old Age) प्रक्रियादेखील गतिमान होत आहे. यामुळे वय झपाटयानं वाढताना दिसतं. काही लोकांना अकाली वृद्धत्वाच्या (Premature Aging) समस्येलाही सामोरं जावं लागत आहे. या गोष्टी टाळण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे. योग्य आहार, व्यायामामुळे ही समस्या दूर ठेवता येते. `टीव्ही 9 हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे. दिवसभर फ्रेश आणि ऊर्जादायी वाटावं, यासाठी बहुतांश लोक चहा (Tea) किंवा कॉफी (Coffee) घेतात. परंतु, रोज प्रमाणापेक्षा अधिक चहा किंवा कॉफीचं सेवन करणं शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी हानिकारक असतं. यामुळे वृद्धत्व लवकर येऊ शकतं. चहा आणि कॉफी अतिप्रमाणात सेवन केल्याने शारीरिक समस्यादेखील निर्माण होऊ शकतात. नियमित मद्यपान (Drinking) आरोग्यासाठी नुकसानदायी असतं. नियमित मद्यपान केल्यानं वय वेगानं वाढू शकतं. मद्यपानामुळं आरोग्यावर आणि अवयवांच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे त्वचेवर झपाट्यानं सुरकुत्या पडू लागतात. अतितणावामुळे (Stress) मानसिक आणि शारीरिक आजार वाढू शकतात. तसेच यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. वजन वाढू लागतं. शांत झोप न येणं, डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण होतात. अतिताण लवकर वृद्धत्व येण्यास कारणीभूत ठरतो. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे रात्री शांत झोप लागत नाही. यामुळे आपल्या कामाची क्षमता कमी होते. लवकर थकवा जाणवू लागतो. तसेच या सर्व गोष्टींमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया गतिमान होते. रोज पुरेश्या प्रमाणात व्यायाम (Exercise) न केल्यास अनेक गंभीर आजार होतात. व्यायाम न केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतात. कमी वयात आजार जडण्याची शक्यता वाढते. तसेच यामुळे वय वाढण्याची क्रिया वेगानं होऊ शकते. चुकीचा आहार अकाली वृद्धत्वास कारणीभूत ठरू शकतो. लठ्ठपणा, पचनक्रिया मंदावणं, रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढणं आणि डायबेटिस या समस्या चुकीच्या आहारामुळे निर्माण होऊ शकतात. चुकीच्या आहारामुळे वय लवकर वाढतं. जीवनशैली आणि आहारात सकारात्मक बदल केल्यास आरोग्य सुधारते आणि अकाली वृद्धत्व दूर ठेवता येतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या