मुंबई, 02 मे : 3 मे रोजी देशभरात रमजान ईद (Ramadan 2022) म्हणजे ईद उल फितर (Eid ul Fitr 2022) साजरी केली जाणार आहे. रविवारी चंद्र न दिसल्याने मरकाजी चांद कमिटीचे मौलाना खालिस रशीद फरंगी महली यांनी 3 मे, मंगळवारी ईद साजरी करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे देशभरात याच दिवशी ईद साजरी होईल. रमजान महिना मुस्लिम बांधवांमध्ये सर्वांत पवित्र महिना मानला जातो, या मध्ये चंद्रदर्शनाला अनन्य साधारण महत्व आहे. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यावर ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद असे म्हणतात. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीमध्ये जावून नमाज अदा करतात म्हणजेच अल्लाहची प्रार्थना करतात आणि त्या नंतर एकमेकांना गळाभेट देऊन एकमेकांना शुभेच्छा आणि ईदी देतात. सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांना शुभेच्छा संदेशही पाठवू शकतो. ईदच्या असेच काही शुभेच्छा देणारे मेसेज.
रमजान ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद आणि ऐश्वर्य, सुख संपत्ति लाभो ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ईद मुबारक!
ईद घेऊन येई आनंद जोडू मनामनांचे बंध सणाचा हा दिवस खास ईद मुबारक तुम्हा सर्वांस रमजान ईद मुबारक! बंधुत्वाचा संदेश देऊया, विश्व बंधुत्व वाढीस लावूया, रमजान ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!
धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!
तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”
अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा… ईद मुबारक!