पावसाळा सगळ्यांना आवडतो. पावसाच्या सरी येतात, सर्वत्र हिरवळ असते त्यामुळे मन आनंदी असते. पण पावसाळ्यांसोबत अनेक आजार पण येतात. याचे कारण आहे पावसाळ्यात आर्द्रता असते. त्यामुळे मच्छर आणि जीवाणूंच्या वाढीसाठी हे पोषक असं वातावरण असतं. जिथं गारा, घाण असते, पावसाचे पाणी जमा होते, अशा ठिकाणी मच्छर आणि जीवाणूंची उत्पत्ती होते. चला जाणून घेऊ कुठले कुठले आजार पावसाळ्यात होतात आणि त्यांना कसा प्रतिबंध करावा. मलेरिया****ची साथ मलेरियाची साथ पावसाळ्यात अधिक असते. मलेरिया एनीफिलीस प्रजातीच्या डासाची मादीच्या चावल्याने होतो. मलेरिया रुग्णाच्या यकृतापर्यंत जाऊन त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो. यात रुग्णाला खूप ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, अंगदुखी , उलटी होणे यासारखी लक्षणे दिसतात. एकदा ताप उतरला की रुग्णाला पुन्हा 24 ते 48 तासांत ताप येतो. घातक आहे डेंग्यूचा ताप myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन यांनी सांगितलं, डेंग्यूचा आजार डास चावल्याने होतो. पण डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात निर्माण होतात. हा ताप एडीस नावाच्या डासाच्या चावण्याने होतो. यात रुग्णाचं पूर्ण शरीर आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. जीवाणूमुळे होणारा कॉलरा कॉलरा दूषित पदार्थ खाण्याने होतो. विब्रियो कॉलरा नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. त्यात रुग्णाला अति प्रमाणात उलट्या आणि जुलाब होतात. रुग्णाला थकवा येतो. कॉलराची लक्षणं पाच सात दिवसांनी दिसून येतात. जुलाब जीव घेणे होऊ शकते पावसाळा आला की जुलाबाचे रुग्ण वाढतात. यात रुग्णांच्या पोटात दुखणे, उलटी अशी लक्षणंही दिसतात. हा आजार पावसाळ्यात दूषित खाद्य पदार्थ खाण्याने आणि दूषित पाणी पिण्याने होतो. त्यामुळे या काळात साफसफाईकडे लक्ष द्यायला हवे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवायला हवी. संसर्गजन्य आहे चिकनगुनिया myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अजय मोहन म्हणाले, चिकनगुनिया पावसाळ्यात पसरतो. हा आजारदेखील डासांमुळेच होतो. यात रुग्णाला सांध्यांमध्ये खूप दुखते. चिकनगुनिया एडिस इजिप्ती आणि एडिस एल्बोपिक्ट्स डास चावल्याने होतो. त्यात अचानक ताप येणे, सांधे आणि स्नायू दुखणे, डोकेदुखी, थकवा, यासारखी लक्षणे दिसतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे. जो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. असे वाचवा स्वतःला हंगामी आजारांपासून मलेरियापासून वाचाण्य्साठी घराजवळ पाणी साचू देऊ नका. सर्वत्र साफसफाई राहिल यासाठी प्रयत्न करा. डेंग्यूपासून वाचण्यासाठी कुठेही पाणी साचू देऊ नका आणि पाणी झाकून ठेवा. कॉलरा आणि जुलाब हे आजार दूषित खाद्य पदार्थातील आणि दूषित पाण्यातील जीवाणूंमुळे होतात ते आपल्या पोटात जाऊन घातक आजारांना कारणीभूत ठरतात. त्यासाठी खाद्यपदार्थ आणि पाणी झाकून ठेवा. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - आरोग्याच्या सामान्य समस्या न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.