JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Heart Disease| ही पानं आरोग्यावर दृदयाच्या आरोग्यावर करतात जादूई परिणाम; Heart attack चा धोका होतो कमी

Heart Disease| ही पानं आरोग्यावर दृदयाच्या आरोग्यावर करतात जादूई परिणाम; Heart attack चा धोका होतो कमी

ओळखलीत का ही कुठली पानं आहेत? महाराष्ट्रातल्या जेवणामध्ये पानांचा वापर कमी तर शेंगांचा जास्त होतो. पण ही पानं आरोग्यासाठी जादूई काम करतात. चांगलं cholesterol वाढवतात तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 10 जून : सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे माणसाचं स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात अनेक आजारांनी तोंड वर काढलं आहे. परिणामी हृदयविकार (food that reduces Heart attack risk) सारख्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे, ताण-तणाव (Stress busters food) यांसारख्या गोष्टींमुळे असे आजार वाढतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून भारतात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भारतात हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्या रूग्णांचा आकडाही सर्वांधिक आहे. मात्र आपण हृदयविकार नियंत्रणात आणण्यासाठी अनेक गोष्टींचा उपयोग करु शकतो. त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवग्याची पानं. शेवग्याच्या शेंगा आपण आहारात सेवन करतो मात्र त्याच्या पानांचाही आरोग्यासाठी मोठा उपयोग होतो हे तुम्हाला माहित आहे का?. वाढत्या वजनामुळे हृदयाशी संबंधित आजार होतात, अशा परिस्थितीत शेवग्याच्या पानांचे नियमित सेवन केल्यास हृदयविकार दूर राहतात. शेवग्याची पाने खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल तयार होण्यास मदत करतात. ज्याचा थेट संबंध रक्तदाब आणि हृदयविकाराशी आहे. त्यामुळे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. शेवग्याची पानं खाल्ल्याने बीपीसुद्धा नियंत्रणात राहतो.

 हेही वाचा - Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात या चुका तुम्हीही कराल; फायद्याऐवजी नुकसानच होईल

संबंधित बातम्या

जेव्हा आपण कोणताही तेलकट किंवा जंक फूड खातो तेव्हा ते आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL चे प्रमाण वाढवते. आहारात तेलकट पदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश असल्यास हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका अर्थात हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो. यासाठी आपण खाण्यापिण्याबाबत पथ्य पाळणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पौष्टिक खाण्यावर भर देणंही. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण म्हणजे उच्च रक्तदाब, त्यावर मात केल्यास हृदयविकाराच्या गंभीर आजारांपासून तुमचा बचाव होईल. हार्ट अटॅक येण्याआधी छातीत वेदना आणि अवस्थता जाणवतो. अशात जास्त उशीर न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क करा किंवा डॉक्टरांना भेटा. काही लोकांना हार्ट अटॅक येण्याआधी चक्करही येते, सोबतच कमजोरी जाणवू लागते. अचानक खूप घाम येत असेल तरीही सावध राहणं आवश्यक आहे. दरम्यान, आजच्या काळात अगदी 24 वर्षांच्या तरूणालाही हृदयविकाराच्या झटक्याने आपला जीव गमवावा लागतोय. हृदयविकाराचा झटका कोणालाही कुठेही आणि कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत आपण याकडे दुर्लक्ष करणं चुकिचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या