JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / जास्त पाणी पिणंही ठरू शकतं घातक, तहान नियंत्रणात ठेवण्याचे हे आहेत सोपे उपाय

जास्त पाणी पिणंही ठरू शकतं घातक, तहान नियंत्रणात ठेवण्याचे हे आहेत सोपे उपाय

पाणी हे मनुष्याच्या शरीरासाठी वरदानच आहे. मात्र अधिक प्रमाणात घेतलं गेलं तर ते घातकही ठरू शकतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जानेवारी: पाणी (water) आपल्या शरीराला (body) आणि एकूणच जगण्याला (life) संतुलित (balanced) बनवतं. मात्र शरीरात पाण्याचं प्रमाण अधिक झालं, तर त्यातून गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ  शकते. शरीराचं आतील चलनवलन आपल्या पद्धतीनं पाण्याची शरीराला किती गरज आहे याचा संदेश देत राहतं. अनेकांना गरजेतून जास्त तहान लागत असते. असे लोक गरजेपेक्षा जास्त पाणी पुन्हा-पुन्हा पिऊ लागतात. सतत जास्त तहान लागण्याची ही स्थिती गंभीर आजाराचं कारण बनू शकते. अनेक संशोधनांमधून (research) समोर आलेलं आहे, की सामान्य माणसानं रोज 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. त्याहून अधिक नको. मात्र मधुमेहाच्या (diabetes) आजारात जास्त तहान लागते. याशिवाय तुम्हाला डिहायड्रेशन (dehydration) झालं असेल अर्थात शरीरात पाण्याची कमी असेल तरी जास्त तहान लागते. एन्झायटीसारख्या (anxiety) मानसिक स्थितीतही व्यक्तीला गरजेतून जास्त पाणी प्यावं वाटतं. याशिवाय अपचन झाल्यासही पचनसंस्था अन्न (food) पचवण्यासाठी अधिक पाणी मागते. अधिक तहान नियंत्रणात आणायची असेल तर आधी आपण किती पाणी पितो याचा नेमका शोध घेतला पाहिजे. आपणच पाण्याचं प्रमाण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काही घरगुती उपायसुद्धा (home remedies) यासाठी उपयोगी पडतील. जसे की, आवळा पावडर आणि मध (honey) यांचं मिश्रण खाणं. भिजवलेली सोप बारीक करून खाल्ल्यानंही ही समस्या कमी होऊ शकतो. एक चमचा काळी मिरी पावडर 4 कप पाण्यात उकळून थंड करून पिल्यानं आराम मिळतो. समस्याच तीव्र झाल्यानं डॉक्टरकडे गेलं पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या