JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे?, आधी हे वाचा

खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय आहे?, आधी हे वाचा

खाल्ल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याची (Drink Water) सवय असेल तर लगेच सावध व्हा. कारण, आयुर्वेदानुसार (Ayurveda) या प्रकारचं पाणी हे शरीराला विषासारखं हानीकारक असतं.

जाहिरात

शरारातील पाण्याची पातळी देखील शुक्राणूंवर परिणाम करते. शरीर हायड्रेट असेल तर, सेमिनल फ्लुएड वाढण्यास मदत होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जानेवारी :  खाल्ल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्याची (Drink Water) सवय असेल तर लगेच सावध व्हा. कारण, आयुर्वेदानुसार (Ayurveda) या प्रकारचं पाणी हे शरीराला विषासारखं हानीकारक असतं. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही दोन घोट पाणी पिऊ शकता, पण त्यापेक्षा जास्त पाणी चुकूनही पिऊ नका. पाणी (Water) ही आपल्या आरोग्यासाठी (Health)  आवश्यक गोष्ट आहे, हे नेहमी सांगितलं जातं, मात्र चुकीच्या पद्धतीनं पाणी पिणं हे आरोग्याला अपायकारक ठरु शकते. ज्यांना जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय (Habit) आहे, त्यांना कदाचित यामुळे होणाऱ्या नुकसानीची कल्पनाही नसेल. त्यामुळे या सवयीचा काय फटका बसू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पचनसंस्थेवर परिणाम एखादी गोष्ट खाल्ल्यानंतर त्याचं पचन होण्याचा कालावधी 2 तास असतो. या कालाधीमध्ये सर्व पदार्थ  अन्ननलिकेच्या माध्यमातून पोटात जातात. त्यानंतर घाणीच्या रुपातून शरीरातून बाहेर जाण्यापूर्वी पोटात त्याचं पचन होतं. तुम्ही या काळात पाणी पिलं तर त्याचा या सर्व प्रक्रीयेवर परिणाम होतो. पोषक तत्वांचा फायदा नाही खाण्यामध्ये अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. शरीरची वाढ होणे तसंच ते निरोगी राहण्यासाठी ही पोषक तत्वं आवश्यक असतात. खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास या पोषक तत्वांचा पूर्ण फायदा होत नाही. वजन वाढते! या सवयीमुळे वजन देखील वाढते. तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर खाताना आणि खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय टाळा. खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास त्याचं पचन नीट होत नाही आणि जेवणाचं रुपांतर ग्लुकोज फॅटमध्ये होतं. अ‍ॅसिडिटीची समस्या खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास ते अन्न पचण्याच्या ऐवजी खराब होतं. त्यामुळे त्याचा गॅस बनू लागतो. तुम्ही तेलकट आणि मसालेदार खात असाल तर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा (Acidity) त्रास होण्याची शक्यता आहे. ब्लड प्रेशरही वाढण्याची शक्यता? खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास शरीरातील इन्सुलीना स्तर वाढतो. त्यामुळे ब्लड प्रेशर (BP) वाढण्याची देखील शक्यता असते. (Disclaimer: या लेखातील माहिती आणि सूचना सामान्य ज्ञानावर आधारित आहे. News18 लोकमत याबाबत कोणतीही हमी देत नाही. या सूचनांची अंमलबजावणी करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या