प्रातिनिधिक फोटो
मुंबई, 16 जुलै : ‘ग्लोबल वॉर्मिंगमुळे (Global Warming) पृथ्वीवर हवामान बदल होतोय. त्यामुळे पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती (natural disaster) येतील आणि पृथ्वीचा नाश होईल’, अशा बातम्या आपल्याला ऐकायला येतात. आपण या बातम्या गांभीर्याने घेत नाही. मात्र, या प्रकरणात शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला असून त्या इशाऱ्यानंतर सर्वांनी खडबडून जागं होण्याची वेळ आली आहे. खरं तर गेल्या 400 कोटी वर्षांत पृथ्वीवर अनेकदा प्रलय आले आहेत. निसर्गाने अनेकवेळा मोठ्या प्रमाणावर विनाशही केला आहे. आता पुढील विनाशाची सुरुवात जगभरातील नद्या (Rivers) आणि तलावांमधून झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलामुळे धोकादायक बॅक्टेरिया (Bacteria) आणि विषारी शेवाळं वेगाने वाढत आहेत. यांच्यापासूनच पृथ्वीवर एक नवीन प्रलय येईल आणि त्यात इतर सजीवांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल. ‘आज तक’ ने या संदर्भात वृत्त दिलंय. कधी झाला होता महाप्रलय? यापूर्वीसर्वात भयानक प्रलय 25.2 कोटी वर्षांपूर्वी आला होता. त्यावेळी परमियन काळ (Permian Period) संपत येत होता. त्यावेळी खूप नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली होती आणि तेव्हाचे जीव ती परिस्थिती सहन करू शकत नव्हते. तेव्हा जंगलांमध्ये आग (Fire) लागली, दुष्काळ (Draught) पडला, समुद्रातील पाणी (Sea Water) खूप गरम झाले होते, धोकादायक बॅक्टेरिया आणि विषारी शेवाळं वाढलं. नद्या, तलाव आणि इतर जलस्रोत जीवघेणे बनले होते, ऑक्सिजन (Oxygen) संपत चालला होता, सजीव मारले जात होते. या भीषण परिस्थितीत फार कमी जीव जगू शकले होते. परमियन काळाचा अंत होत असताना आलेल्या प्रलयामध्ये पृथ्वीवर राहणाऱ्या 70 टक्के प्रजाती नष्ट झाल्या होत्या. तर समुद्रात राहणाऱ्या 80 टक्के प्रजाती नष्ट झाल्या होत्या. म्हणूनच शास्त्रज्ञ याला ‘द ग्रेट डायिंग’ (The Great Dying) म्हणतात. याचाच पुरावा आता ऑस्ट्रेलियात (Australia) सापडला आहे. खरं तर सध्या पृथ्वीवरील लोक ग्लोबल वॉर्मिंगचा विषय गांभीर्याने घेत नाहीत, असं त्यांच्या वागण्यावरून जाणवतं. माणूस सतत जीवाश्म इंधने (Fossil fuels) काढून टाकत आहे. परंतु पृथ्वीच्या ज्या थरांमधून जीवाश्म इंधन बाहेर, तिथूनच आता प्रलयाचे पुरावे सापडत आहेत. Dangerous dog : कितीही क्युट वाटले तरी पाळू नका, मालकाचाही जीव घेतात हे खतरनाक श्वान ग्लोबल वॉर्मिंगची पातळी सातत्याने वाढत आहे, असं अलीकडच्या अनेक अभ्यासांतून असं समोर आलंय. जुन्या प्रलयांचे पुरावे शोधणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमचा भाग राहिलेले कनेक्टिकट विद्यापीठातील सेडिमेंटॉलॉजिस्ट (Sedimentologist) ख्रिस्तोफर फील्डिंग म्हणाले, की सध्याचं जागतिक तापमान परमियन काळाइतकंच जवळ येतंय. जगातील अनेक नद्या आणि तलावांमध्ये धोकादायक जीवाणू आणि विषारी शेवाळं (Poisonous algae0 यांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशीच परिस्थिती 25.2 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. त्यामुळे नद्या आणि तलाव श्वास घेऊ शकणार नाहीत आणि अनेक प्रजातींचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल. एक प्रजाती नष्ट झाल्यामुळे त्याचा दुसऱ्या प्रजातीवर परिणाम होईल. यामुळे पृथ्वीची परिसंस्था (ecosystem) बिघडेल आणि हीच प्रलयची सुरुवात असेल. पृथ्वीवरील सध्याची परिस्थिती काय? ज्या पद्धतीने पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे जंगलात आग लागण्याच्या घटना वाढणार आहेत. याचं सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे 2019 च्या शेवटी आणि 2020 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील जंगलांत लागलेली आग. यामध्ये लाखो प्राण्यांचा आणि जिवांचा मृत्यू झाला होता. कॅलिफोर्नियापासून (California) युरोपापर्यंत (Europe), रशियाच्या (Russia) आर्क्टिक प्रदेशापासून (arctic region) भारतातील उत्तराखंडच्या पर्वतापर्यंत सगळीकडे वाढत्या तापमानामुळे जंगलांना आग लागली आहे. त्यामुळे जंगलात राहणारे प्राणी नष्ट होत आहेत. हे विनाश केव्हाही मोठ्या विनाशाचे रूप धारण करू शकतात. या वणव्याचे अनेक प्राचीन पुरावे दगडांवरील खुणांवरून सापडले आहेत. असा सामूहिक विनाश केवळ ऑस्ट्रेलियातच नव्हे तर उत्तर ध्रुवाजवळील सायबेरियातही झाला होता. उंदरांनी घरात उच्छाद मांडलाय? या सोप्या घरगुती उपायांनी लावा त्यांना पळवून विनाश कधी होणार? पृथ्वीवर पुढचा प्रलय कधी येईल, हे अद्याप शास्त्रज्ञांनी सांगितलं नाही; पण पृथ्वीवर विनाशाची सुरुवात आधीच झाली आहे, असं ते म्हणाले. कार्बन डायऑक्साइडमुळे वाढणारी उष्णता, सूक्ष्मजीवांची सतत वाढ, अनेक प्रकारच्या रोगांचा प्रसार, जंगलातील आग, हिमनद्या वितळणं, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणं, अशा अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. पण प्रलयाची खरी सुरुवात नद्या आणि तलावांपासून होईल. आपले जलस्रोत ऑक्सिजन मुक्त होतील. त्यामुळे पृथ्वीवर जगणारे सजीव प्राणी व झाडं-वनस्पती नष्ट होतील. मग विनाशाची ही प्रक्रिया वेगाने त्या क्षेत्राभोवती पसरेल आणि पुढे संपूर्ण राज्य, देश आणि नंतर महाद्वीप व्यापतील. सर्वांनी ग्लोबल वॉर्मिंगला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. नाहीतर पुढच्या काही वर्षांमध्ये याचे गंभीर परिणाम दिसू लागतील, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.