JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तु्मच्याही खाण्यासंदर्भात तक्रारी आहेत का? हा असू शकतो आजार, जाणून घ्या लक्षणं

तु्मच्याही खाण्यासंदर्भात तक्रारी आहेत का? हा असू शकतो आजार, जाणून घ्या लक्षणं

असंतुलित आहारामुळे आजारपण तर उद्बवतेच मात्र खाण्याचाही आजार आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

जाहिरात

रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक कमी झाली तर ती परिस्थिती हाताळण्यासाठी तयार राहा.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लोकांच्या दिनचर्येत आहारासंबंधीत वाईट सवयी असतात आणि त्यांनाच इटिंग डिसऑर्डर असे म्हटले जाते. तसे पाहिले तर महिला आणि पुरुषांना इटिंग डिसऑर्डर कुठल्याही वयात होऊ शकते. किशोरवयीन मुलांमध्ये ही समस्या प्रकर्षाने दिसून येते. इथे अशा चार इटिंग डिसऑर्डर विषयी सांगतो आहोत ज्यांच्याकडे आपण सहसा दुर्लक्ष करतो. एनोरेक्सिया नर्वोसा (वजनाविषयी चुकीची समजूत) myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. अनुराग शाही सांगतात की, हा असा एक भोजनाशी निगडीत आजार आहे, ज्यात खाण्याने शरीराचे वजन खूप कमी होईल किंवा वाढेल याची भीती माणसाच्या मनात असते. त्याच्या मनात शरीराच्या वजनाविषयी चुकीच्या समजुती असतात. एनोरेक्सियाने ग्रस्त लोक आपले वजन आणि आकार नियंत्रणात ठेवण्यासाठी अवाजवी प्रयत्न करतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होतो. ते अत्याधिक व्यायामानेही वजन घटवण्याचा प्रयत्न करतात. एनोरेक्सियाची वास्तविक कारणे अजून ज्ञात नाहीत पण अन्य आजारांप्रमाणेच जैविक, मानसिक आणि पर्यावरणीय कारणांचा हा एकत्रित परिणाम असावा, असे मानले जाते. बुलिमिया नर्वोसा (खूप जास्त खाणे) बुलिमिया नर्वोसा ही एक गंभीर  इटिंग डिसऑर्डर आहे. या विकाराने पीडित व्यक्ती खूप जास्त प्रमाणात जेवण करतात. नंतर लठ्ठपणाच्या भीतीने अतिरेकी व्यायाम करतात किंवा उलटी करतात. हा आजार एनोरेक्सिया नर्वोसाच्या अगदी विरोधी आहे. यात लोक नेहमीच काहीना काही खातच असतात. या विकाराचे लक्षण म्हणजे पॅक, प्रोसेस्ड आणि जंक फूडचे सेवन, शरीराच्या आकाराची काळजी आणि त्याला लपवण्याचा प्रयत्न, सतत स्वत:ला आरश्यात पाहणे, पोटाच्या समस्या जसे वात, बद्धकोष्ठता, सुजलेला चेहरा हीआहेत. हा फक्त विकाराच नाही तर एक मानसिक समस्या आहे. ज्यात व्यक्ती स्वतः विषयी नकारात्मक विचार करते. पण योग्य वेळी उपचार केले तर निश्चितच बरे होऊ शकते. बिंज इटिंग डिसऑर्डर **(**भूक नसताना खाणे ) बिंज इटिंग डिसऑर्डर या विकारात लोक रोज अत्याधिक खातात, त्यांचे स्वतःवर नियंत्रण नसते. हे लोक भूक नसतानाही बकाबका खातात. तोपर्यंत खात राहतात जोपर्यंत त्यांचं पोट भरून त्यांना अस्वस्थ वाटत नाही. ऑर्थोरेक्सिया (पोषक खाण्याची जिद्द) हा विकार त्या लोकांना आहे ज्यांना नेहमीच पोषक खाण्याची चिंता सतावत असते. त्यांना याचे जणू वेडच लागते. जेव्हा त्यांना आहारात पोषक पदार्थ मिळत नाहीत तेव्हा त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. हे लोक आपला आहार कमी करतात आणि काही विशिष्ट पदार्थच खाऊ लागतात. याची अन्य लक्षण म्हणजे जंक किंवा आरोग्याला हानी करणारे पदार्थ बिलकुल न खाणे, जेवणात कच्चे सलाड जास्त प्रमाणात खाणे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की, संतुलित आहार आवश्यक आहेच आणि तो तेव्हाच घ्या जेव्हा गरजेचा आहे. भूक लागली आहे आणि भूक लागली असताना भूक मारणेही योग्य नाही. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मेटाबॉलिक सिंड्रोम न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्यासाठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या