शारीरिक संबंध ठेवताना अनेकांचं डोकं दुखतं. त्याला सेक्स हेडेक म्हणतात. साधारण परिस्थितीमध्ये काळजीचं कारण नाही, पण जर हे वारंवार होत राहिलं तर मात्र हे मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. संबंध ठेवताना जसजशी उत्तेजना वाढते तसतसं डोकं आणि मानेवर दबाव वाढत जातो. काही लोकांना लैंगिक संबंधापूर्वी किंवा संबंधानंतर खूप डोकेदुखी होते. मस्तकाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून हा त्रास होतो. सेक्स हेडेक****ची लक्षणं सेक्स हेडेक अर्थात लैंगिक संबंधांवेळी होणारी डोकेदुखी दोन प्रकारची असते. 1. डोके आणि मानेमध्ये लैंगिक उत्तेजना जशी वाढत जाते, तशीतशी वाढणारी वेदना 2. शरीरसंबंधाच्या आधी किंवा नंतर अचानक होणारी तीव्र डोकेदुखी. काही लोकांना दोन्ही प्रकारच्या वेदनांचा त्रास होतो. ह्या वेदना काही मिनिटं किंवा कधी कधी दोन-तीन दिवसही राहतात. जर परिस्थिती बिघडली तर व्यक्ती बेशुद्धही होते, उलट्या होऊ शकतात आणि अन्य मेंदूशी निगडीत समस्या निर्माण होतात. हा धोका ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे त्यांना अधिक असतो. महिलांपेक्षा पुरुषांना सेक्स हेडेक अधिक होतो. डॉक्टरांना केव्हा भेटावं? साधारणपणे कुठलीही डोकेदुखी चिंताजनक नसते. पण शरीर संबंध ठेवताना डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवा सगळ्यात उत्तम म्हणजे जेव्हा पहिल्यांदा असा त्रास होईल तेव्हा तात्काळ दाखवणं उत्तम, नाहीतर हा त्रास सहा महिने ते एक वर्ष होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंटच्या अहवालानुसार, अनेक लोक सेक्स हेडेकबाबत डॉक्टरांशी बोलायला घाबरतात आणि डॉक्टरही अनेकदा विचारात नाहीत, त्यामुळी समस्या तशीच राहते. सेक्स हेडेक****ची कारणे शरीरसंबंधाच्या वेळी धमणी फुलते किंवा त्यात बुडबुडा निर्माण होतो (इंट्राक्रानियल एन्युरिज्म) त्याने वेदना होतात. कधीकधी धमणीच्या भिंतीतून रक्तस्त्राव होतो. याने स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात होऊ शकतो. कधी कधी काही औषधांमुळे देखील ह्या वेदना होतात उदाहरण द्यायचे झाल्यास काही बर्थ कंट्रोल पिल्सचा उपयोग याला कारणीभूत होऊ शकतो. काही संसर्गामुळे येणारी सूज देखील डोकेदुखीचं कारण होऊ शकते. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, मस्तकाचं स्कॅनिंग किंवा एमआरआयद्वारे समस्येचा शोध घेतला जाऊ शकतो. सेक्स हेडेक****पासून कसा बचाव करावा? सेक्स हेडेकपासून बचाव करण्यासाठी ऑर्गेझमच्या अगोदरच शरीरसंबंध थांबवावा. शारीरिक संबंध करताना निष्क्रिय भूमिका ठेवून यापासून वाचता येतं. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली म्हणाले, लोकांनी या समस्येविषयी मोकळेपणानं बोललं पाहिजे. नियमितपणे असे व्यायाम केले पाहिजे ज्याने मान, डोके, खांदे यांच्या स्नायूंना आराम मिळेल. लैंगिक संबंध संयमाने करावे. जे लोक नियंत्रण घालवतात त्यांना सेक्स हेडेक होतो. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मायग्रेन न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._