दिवाळी फॅशन
मुंबई, 11 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं की सजावटीसह फॅशनचीही लगबग असते. अगदी कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत तयारी सुरू होते. बहुतेक महिलांचा या पारंपारिक सणादिवशी सोन्याचे दागिने घालण्याकडे कल असतो. कारण सोन्याचे दागिने महिलांच्या सौंदर्यात आणखी भर घालण्याचे काम करतात. त्यातही तुम्हाला एक वेगळा खास लूक मिळविण्यासाठी सोन्याचे दागिने घालताना काही टिप्स फॉलो करू शकता, त्याविषयी जाणून (Fashion tips) घेऊया. वास्तविक, सोन्याचे दागिने वारंवार बदलणे शक्य नसते. त्यामुळे बहुतेक महिला प्रत्येक फंक्शनमध्ये तेच दागिने घालतात. त्यामुळे लूकमध्ये काही वेगेळेपण दिसत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सोन्याचे दागिने घालण्याविषयी काही टिप्स सांगणार आहोत, ज्या वापरून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांचा उत्तम लुक मिळवू शकता. सोन्याचे दागिने घालताना या टिप्स फॉलो करा - सिंपल लुक ट्राय करा - कधीकधी स्त्रिया एकावेळी खूप दागिने घालतात. ज्यामुळे उलट लूक खराब होतो. वेगळा, स्पेशल लुक येण्यासाठी लाईट सोन्याच्या दागिने घालण्याचा प्रयत्न करा. सोन्याचे पेडेंट किंवा चोकर तुमचा लुक उत्तम बनवू शकतात. तसेच लांब नेकलेस हेवी लूक देण्याचे काम करतात. त्यामुळे लग्नासारख्या समारंभात जड दागिने घालणे चांगले. हे वाचा - Diwali 2022 : दिवाळीत साडी नेसा किंवा ड्रेस घाला; या अॅक्सेसरीज परफेक्ट बनवतील तुमचा लूक कलर कॉम्बीनेशनकडे लक्ष द्या - अर्थात सोन्याचे दागिने स्त्रियांना खूप शोभतात. पण प्रत्येक पोशाखात सोन्याचे दागिने चांगले दिसत नाहीत. वेगवेगळ्या लूकनुसार दागिन्यांची निवड करणे खूप गरजेचे आहे. पांढरे किंवा गुलाबी असलेले सोन्याचे दागिनेही तुमचा लुक वाढवू शकतात. सिंगल स्टेटमेंट पीस - सोन्याच्या दागिन्यांमध्ये उत्तम लुक येण्यासाठी, प्रत्येक प्रसंगात भरपूर दागिने घालणे टाळा. यासाठी तुम्ही स्टेटमेंट पीसचा ट्रेंडही फॉलो करू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या खास प्रसंगी, कॉकटेलच्या कानातल्यापासून ते पेंडंटपर्यंत, सोन्याच्या अॅक्सेसरीजचे एकच स्टेटमेंट ठेवा, यामुळे तुमचा लुक खूपच वेगळा दिसेल. गोल्ड आणि मेटेल मिक्सचर - आजकाल मेटल ज्वेलरी घालण्याचा ट्रेंडही खूप वाढला आहे. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांसोबत वेगळा लुक मिळविण्यासाठी आपण सोन्यासोबत काही मेटलचे दागिनेदेखील कॅरी करू शकता. चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने सोन्याच्या अंगठ्यांसोबत खूप खास दिसतात. दुसरीकडे आपण विंटेज, मेटल आणि कंटेपरेरी पीसेजमुळे सहज स्टायलिश लुक आणू शकता.