JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Life@25 : सतत तिच्या एक्स-शी माझी तुलना; बायकोच्या मनातून त्याला बाहेर कसं काढू?

Life@25 : सतत तिच्या एक्स-शी माझी तुलना; बायकोच्या मनातून त्याला बाहेर कसं काढू?

बायको तिच्या Ex ला विसरली नसेल आणि तुमच्यात त्याला शोधत असेल तर काय करायचं?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

“6 महिन्यांपूर्वी माझं अरेंज मॅरेज झालं. लग्नानंतर 3 महिन्यांनी मला माझ्या बायकोच्या लग्नाआधीच्या रिलेशनशिपबाबत समजलं. तिला मी त्याबाबत विचारलं. सुरुवातीला तिने सांगायला टाळाटाळ केली. पण नंतर तिने सर्व सांगितलं. आता तर आम्ही दोघं जेव्हा एकमेकांशी गप्पा मारतो तेव्हा ती फक्त आणि फक्त त्याच्याबाबतच बोलते. फक्त इतकंच नव्हे तर ती माझी तुलना त्याच्याशी करते. मला यामुळे खूप त्रास होतो.” “तिने माझ्याशी लग्न केलं तरी तिच्या ex ला ती विसरली नाही. तिच्या मनातून त्याला बाहेर काढून तिच्या मनात माझं स्थान कसं निर्माण करू?” हेहीवाचा- Life@25 : “बायको माझ्यापेक्षा जास्त कमावते म्हणून सर्वजण माझी खिल्ली उडवतात”

हेहीवाचा- Life@25 : लग्नानंतर मुलीने आडनाव बदलणं बंधनकारक आहे का? मुंबईतील मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे -  “तुमची बायको तिच्या ex शी तुमची तुलना करते याचा अर्थ तिने तुम्हाला अजून स्वीकारलं नाही. ती अजूनही त्याला विसरली नाही. हे स्पष्ट होतं. त्यामुळे तिचं फार मनावर घेऊ नका. शांतपणे तिची समजूत काढा, तुमची बाजूही मांडा. मी हा असाच आहे, बदलणार नाही हे तिला सांगा.” “हा पण तुमच्या वागण्याने तिच्यात वागण्यामुळे तिला त्रास होत असेल. म्हणजे तुम्ही ओरडत असाल, चिडचिड करत असाल तर मात्र तुम्ही तुमच्या स्वभावात बदल करायला हवा.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या