JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर

वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर

जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हीही हे डाएट फॉलो करून पाहा.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 09 डिसेंबर : हल्लीच्या काळात वाढलेलं वजन ही प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीला भेडसावणारी मुख्य समस्या आहे. कोरोना काळात घरातून काम केल्याने शरीराची हालचाल मंदावली, बाहेर पडता येत नव्हतं, त्यामुळे अनेकांचं वजन वाढलं. ते वजन कमी करण्यासाठी अनेकांनी जिम लावली तर काहींनी व्यायाम केला. पण वजन मात्र कमी झालं नाही. वाढलेलं वजन आत्मविश्वास कमी करतं, त्यामुळे अनेक जण डाएट आणि जिम यांची सांगड घालत वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे वर्कआउट्स आणि एक्सरसाइजचा रुटीनमध्ये समावेश करतो. इंटरनेटवरही आपण वजन कमी करण्याचे अनेक पर्याय शोधत राहतो. पण आज आम्ही तुम्हाला अशाच डाएटबद्दल सांगत आहोत, जे 2022 मध्ये सर्वाधिक ट्रेंडिंग होते. जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हीही हे डाएट फॉलो करून पाहा. हा व्हेजिटेरियन आणि आणि नॉन व्हेजिटेरियन डाएटचा मिश्र प्रकार आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असल्यामुळे तो वजन कमी करण्यास मदत करतो. यामध्ये अधिकाधिक व्हेजिटेरियन फूड खाण्यावर आणि मांसाहार कमी करण्यावर भर देण्यात येतो. हे डाएट वजन कमी करण्यास मदत करतं, तसंच हृदयविकार आणि टाइप-2 डायबेटिसचा धोका कमी करतं. मेडिटेरेनियन डाएट मेडिटेरेनियन डाएटमध्ये थोड्या ऑलिव्ह ऑइलसह पूर्णपणे वनस्पती-आधारित डाएटचा समावेश असतो. या डाएटचा फोकस पूर्णपणे ताजं अन्न खाण्यावर असतो. या डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्या, नट्स आणि धान्य समाविष्ट असतात. यासोबतच थोड्या प्रमाणात मासे आणि पोल्ट्रीतील पदार्थांचाही समावेश असतो. यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स, लाल किंवा प्रोसेस्ड मीट आणि कमी गोड पदार्थ खाल्ले जातात. गाजर, कांदे, ब्रोकोली, पालक, केळी, लसूण, मशरूम, वाटाणे अशा मिश्र भाज्यांचा या डाएटमध्ये समावेश असतो.

पॅलिओ डाएट 2022 मध्ये वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांमध्ये पॅलिओ डाएटची खूप क्रेझ पाहायला मिळाली. या डाएटमध्ये ताजी फळं आणि भाज्या, बिया आणि नट्स, लीन मीट, ओमेगा 3 फॅटी ऍसिड असलेले मासे आणि प्रक्रिया न केलेलं तेल यावर विशेष फोकस असतो. वजन कमी करण्यास, भूक कमी करण्यास, ब्लड शुगर व ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यास हे डाएट मदत करतं. या डाएटमध्ये धान्य, शेंगा, डेअरी प्रॉडक्ट्स, प्रक्रिया केलेले अन्न, मीठ, प्रोसेस केलेली साखर खाणं टाळायचं असतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या