JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / विमानातील दोन्ही पायलटना दिलं जातं वेगवेगळं जेवण, आश्चर्यकारक आहे कारण

विमानातील दोन्ही पायलटना दिलं जातं वेगवेगळं जेवण, आश्चर्यकारक आहे कारण

प्रत्येक विमानात दोन पायलट असतात. यामागे प्रवाशांची सुरक्षितता हे महत्वाचं कारण असतं. पण या दोन्ही पायलटला जेवणात नेहमी वेगवेगळं अन्न (Different Food for both pilots) दिलं जातं. त्यांना कधीही एकच अन्नपदार्थ दिले जात नाहीत. अर्थात यामागं काही कारणं आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मार्च: विमान प्रवास (Air travel) हा खरं तर प्रत्येकासाठी अनेक अर्थांनी औत्सुक्याचा विषय असतो. या प्रवासादरम्यान प्रवाशांना आलेले विविध अनुभव आपण नेहमीच ऐकत आणि वाचत असतो. त्यामुळे या अनुषंगाने आपली उत्सुकता अधिकच वाढलेली असते. विमानाची अंतर्गत रचना, सुविधा, स्टाफ आदी गोष्टी प्रत्येक प्रवासावेळी नव्यानं अनुभवायला मिळत असतात. पायलट (Pilot) ही विमानातील स्टाफपैकी  सर्वात महत्वाची व्यक्ती असते. अत्यंत शिस्तबद्ध आणि कौशल्याने तो आपलं काम करत असतो. पण या पायलटबाबत एक अनोखी गोष्ट सांगितली जाते. कदाचित ही गोष्ट फार कमी जणांना माहिती असावी. प्रत्येक विमानात दोन पायलट असतात. यामागे प्रवाशांची सुरक्षितता हे महत्वाचं कारण असतं. पण या दोन्ही पायलटला जेवणात नेहमी वेगवेगळं अन्न (Different Food for both pilots) दिलं जातं. त्यांना कधीही एकच अन्नपदार्थ दिले जात नाहीत. अर्थात यामागं काही कारणं आहेत. विमान प्रवासादरम्यान दोन्ही पायलटला जेवणात वेगवेगळे अन्नपदार्थ दिले जातात. सर्वसामान्यपणे पायलटला फर्स्ट क्लासचं जेवण आणि को-पायलटला बिझनेस क्लासचं (Business class) जेवण दिलं जातं. अनेक विमान कंपन्या कॉकपिट क्रू मेंबरसाठी (Cockpit crew member) देखील वेगळं जेवण बनवतात. या विमान कंपन्या पायलट आणि को-पायलटला स्वतंत्र जेवण देतात. हे जेवण प्रवाशांच्या जेवणापेक्षा वेगळं असतं. हे जेवण अत्यंत साधं असतं. हे वाचा- Vastu: मेन गेटपासून स्वयंपाक घरापर्यंत या छोट्या चुका करतात मोठं नुकसान; आजपासूनच बदला या सवयी 1984 मध्ये एक कॉनकॉर्ड सुपरसॉनिक विमान लंडनहून न्यूयॉर्कला जात होतं. या विमानात एक आश्चर्यकारक घटना घडली. या विमानातून एकूण 120 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना एकसारखं जेवण देण्यात आलं. पण या जेवणात काहीतरी गडबड होती. त्यामुळे सर्व लोकांना फूड पॉयझनिंग (Food poisoning) अर्थात अन्नातून विषबाधा झाली. या लोकांना उलट्या, डायरिया झाला आणि ताप आला. फूड पॉयझनिंगमुळे एका प्रवाशाचा मृत्यूदेखील झाला. यामुळे दोन्ही पायलटना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. 2012 मध्ये सीएनएनने एका कोरियन पायलटची (Korean pilot) मुलाखत घेतली होती. त्यावेळी या पायलटनं सांगितलं की, ‘फूड पॉयझनिंगचा धोका टाळण्यासाठी दोन्ही पायलटना जेवणात वेगवेगळे अन्न पदार्थ दिले जातात.’ हे वाचा- तुम्हाला माहीत आहे? व्यक्तीच्या दिसण्यावरून-उंचीवरूनही ओळखू शकता त्याचा स्वभाव एकूणच फूड पॉयझनिंग होऊ नये, यासाठी विमानातल्या पायलट आणि को-पायलटला एकसारखं जेवण दिलं जात नाही. एकाला फूड पॉयझनिंग झालं तर किमान दुसरा पायलट सुरक्षित राहावा आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी या दोघांच्या जेवणात बदल केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या