JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नानंतर पुरुष वा महिलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

लग्नानंतर पुरुष वा महिलांनाही येऊ शकतं डिप्रेशन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

या गोष्टींची काळजी घेतल्यास पोस्ट मॅरेज डिप्रेशनपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मार्च : लग्न (Marriage) हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सर्वात मोठं स्थित्यंतर होतं. स्त्री आणि पुरुष दोघांच्या जीवनात लग्नानंतर अनेक बदल होतात. स्त्रीला आपल्या आई-वडिलांचं घर सोडून सासरी जावं लागतं. सासरच्या जबाबदाऱ्या (Responsibilities) तिच्या खांद्यांवर येतात. नवीन लोकांमध्ये राहून तिला या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्याची कसरत करावी लागते. तर, लग्नानंतर पुरुषांना आपल्या पत्नीची (Wife) जबाबदारी आणि काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या चांगल्या-वाईट सवयी, वेगळे स्वभाव या सर्व गोष्टींचा सुवर्णमध्य काढून सोबत रहावं लागतं. प्रसिद्ध लेखक डेव्ह मूरच्या शब्दात सांगायचं झाल्यास, जेव्हा ‘इम्परफेक्ट कपल’ (Imperfect couple) आपल्यातील मतभेदांचा स्वीकार करून आयुष्याचा आनंद घेतं, तेव्हा त्याला खऱ्या अर्थानं लग्न म्हणतात. काहीजण लग्नानंतर होणारे बदल (Change) अगदी सहज स्वीकारतात तर काहींना ही गोष्ट अतिशय कठीण जातं. काहीजण तर पोस्ट मॅरेज डिप्रेशनलादेखील (Post Marriage Depression) बळी पडतात. आपल्या देशामध्ये याबद्दल अजूनही लोकांना फारशी माहिती नाही. मुलींच्या बाबतीत, नवीन सुनांचे मूड स्विंग्ज (Mood Swings) समजून याकडं दुर्लक्ष केलं जातं तर, डिप्रेस (Depress) असलेले बहुतेक पुरुष आपल्या भावना मनातच दडपून ठेवतात. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लग्नानंतरचं नैराश्य म्हणजेच पोस्ट मॅरेज डिप्रेशन ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये नवविवाहित जोडप्याला दुःखी (Sad) आणि निराश (Disappointed) वाटू लागतं. या भावना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात अडथळा बनू लागतात. लग्नानंतरचं नैराश्य हे क्लिनिकल डिप्रेशनपेक्षा (Clinical Depression) काहीसं वेगळं असतं. हे फक्त लग्नाशी संबंधित गोष्टींमुळे येतं. काही प्रकरणांमध्ये, एंगेजमेंटनंतरही डिप्रेशनची लक्षणं दिसू शकतात. पोस्ट मॅरेज डिप्रेशन येण्यास विविध घटक कारणीभूत असतात. भारतामध्ये तर पोस्ट मॅरेज डिप्रेशन ही खूप सामान्य बाब आहे. आपल्याकडे लग्न झाल्यानंतर लगेचच स्त्रियांना नवीन कुटुंबाशी जुळवून घेणं कठीण जातं. त्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर याचा वाईट परिणाम होतो. ‘सिंगल’ (Single) स्टेटसमधून ‘सूने’च्या रोलमध्ये जाताना मुलींना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात लागतात. अचानक झालेल्या या बदलामुळे मुलींना जबाबदाऱ्यांचं कधीकधी ओझं वाटू लागतं. भारतामध्ये आजही पुरुषप्रधान संस्कृती (Male Dominated Society) आहे. त्यांच्या निर्णयांना आणि त्यांना जास्त महत्त्व आणि मान दिला जातो. यामुळे महिलांना अचानक बदलणाऱ्या जीवनाशी जुळवून घेताना अडचणी येतात. त्यात, नोकरदार महिलांवर तर दुहेरी कामाचा बोजा लादला जातो. काही ठिकाणी लग्नानंतर पती (Husband) आणि सासरचे (In-laws) लोक मुलीचं स्वातंत्र्य (Freedom) हिरावून घेतात. तिच्या आयुष्यातील सर्व निर्णय घरातील इतर व्यक्ती घेतात. या गोष्टी महिलांना हळूहळू डिप्रेस करू शकतात. पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर, लग्नानंतर त्यांना नोकरी-व्यवसायासोबतच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडव्या लागतात. आपल्या देशात आजही पुरुषांना घरचा प्रमुख मानलं जात असल्यानं घर चालवण्याच्या जबाबदारीचा त्यांच्यावर खूप मोठा दबाव असतो. हा दबाव सामाजिक (Social) आणि आर्थिक (Financial) असू शकतो. याला सामोरं जाण्यासाठी, बरेचजण दारू पितात. यातून डिप्रेशन वाढत जातं. हे ही वाचा- झटक्यात वेगवेगळे रंंग ओळखतात बायका! पुरुषांच्या तुलनेत रंगज्ञान जास्त का? एखादी व्यक्ती पोस्ट मॅरेज डिप्रेशनची बळी ठरली आहे किंवा आपण स्वत: या परिस्थितीमध्ये अडकलो आहोत, हे कसं ओळखावं? इतर कुठल्याही प्रकारच्या डिप्रेशनप्रमाणं पोस्ट मॅरेज डिप्रेशनचीदेखील काही लक्षणं आहेत. - चिंता (Anxiety) - उदासीनता (Depression) - व्यवस्थित झोप पूर्ण न होणं. - भूक न लागणं. - पार्टनर आणि सासरच्या व्यक्तींबाबत भ्रमनिरास होणं. - नवीन कुटुंबातील लोकांच्या वागणुकीबाबत संभ्रम तयार होणं. - आयुष्यात काहीही अर्थ राहिला नाही, असे विचार येणं. - कंटाळा येणं. - मोटिव्हेशन न मिळणं. - लग्नाअगोदरच्या डेटिंग पीरिएडची (Dating Period) आठवण येणं. - असमाधानी वाटणं. - स्वत:ला कमी लेखणं. पोस्ट मॅरेज डिप्रेशन ही अतिशय सामान्य बाब आहे. नवीन लग्न झालेली कोणतीही व्यक्ती या स्थितीमध्ये जाऊ शकते. लग्नांनंतर काही ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास यापासून बचाव करता येऊ शकतो - आयुष्यातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या. जास्त ताण घेण्याची आवश्यकता नसते. - तुम्हाला एखादी गोष्ट त्रास देत असेल तर पार्टनर किंवा कुटुंबातील लोकांसोबत ती शेअर करा. - तुमचे काही विवाहित मित्र-मैत्रिणी असतील तर त्यांच्याशी बोला. त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. - मेंटल स्ट्रेसपासून वाचण्यासाठी कुटुंबाच्या संपर्कात रहा. - आपल्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करा. तुमच्या अडचणींवर दोघं मिळून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करा. - आपल्या एखाद्या आवडीच्या गोष्टीमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा. - वरील सर्व उपाय करूनही सोल्युशन मिळत नसेल तर मेंटल हेल्थ एक्सपर्टकडे (Mental Health Expert) जाऊन तपासणी करून घ्या. वरील गोष्टींची काळजी घेतल्यास पोस्ट मॅरेज डिप्रेशनपासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या