JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Post Dengue Malaria Diet: डेंग्यू आणि मलेरिया पासून बचाव करायचा असेल तर फॉलो करा या 5 गोष्टी!

Post Dengue Malaria Diet: डेंग्यू आणि मलेरिया पासून बचाव करायचा असेल तर फॉलो करा या 5 गोष्टी!

सध्या पावसाळा सुरू असून या वातावरणात डेंग्यू आणि मलेरियाच्या (dengue malaria and chikungunya disease) आजारांनी थैमान घातले आहे. आधीच कोरोनामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झाला असून त्यात आता या रोगांची भर पडत असल्याने लोकांना आपल्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : सध्या पावसाळा सुरू असून या वातावरणात डेंग्यू आणि मलेरियाच्या (dengue malaria and chikungunya disease) आजारांनी थैमान घातले आहे. आधीच कोरोनामुळे लोकांच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झाला असून त्यात आता या रोगांची भर पडत असल्याने लोकांना आपल्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. आपल्या घराबाहेर किंवा आजूबाजूला पावसाळ्यामुळे साचणाऱ्या पाण्याच्या माध्यमातून हे डास (disease difference between malaria and dengue mosquito) तयार होत असून त्या डासांच्या चावण्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांची लागण आपल्याला होत आहे. त्याचबरोबर या आजारांचा सर्वात जास्त धोका हा घरातील लहान मुलांना आणि घरातील ज्येष्ठांना (symptoms of malaria and dengue) असल्याने अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या आजारांवर मात करण्यासाठी आणि आपल्या शरीराला या डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला या रोगांपासून आपल्या आरोग्याचे संरक्षण करता येईल. प्रसिद्ध आहार तज्ज्ञ (Nutritionist) ऋतुजा दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याला दररोजच्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये आपण आपल्या आहारात सकाळी जेवताना एक चमचा गुलकंदाचा समावेश करायला हवा. त्यामुळे आपल्याला मळमळ आणि अशक्तपणातून सुटका मिळू शकते. Darker Lips: काळ्या ओठांपासून कशी सुटका मिळवावी, जाणून घ्या दूध दररोज सकाळी एक ग्लासभर पाण्यात किंवा दुधात थोडे केशर आणि जायफळ मिसळायला हवे. त्याचबरोबर त्यात आपल्या चवीनुसार गूळही मिसळावे. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा कमी करता येतो.

संबंधित बातम्या

तांदळाचे सूप तांदळापासून बनवलेल्या सूपात हिंग आणि तूप मिसळून त्याचा आपल्या आहारात समावेश केल्याने या रोगांपासून आपला बचाव करता येतो. केसांना फार वेळ मेहंदी लावून ठेवणं धोकादायक; किती वेळाने धुवून टाकणं चांगलं? पाणी आपल्या शरीरातील लघवीचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आणि त्यासंदर्भातील विकार टाळण्यासाठी सतत पाणी पित रहायला हवं. अय्यंगार शैली योग पाठीला आधार देण्यासाठी बोल्स्टर आणि मानेला आधार देण्यासाठी आवश्यक असल्यास डोक्याखाली एक घोंगडी घ्यायला हवी. जेणेकरून पाठदुखी आणि शरीरातील वेदना आणि थकवा कमी होण्यास मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या