शुगर पेशंटला याचा धोका जास्त असतो. हातापायाल गॅँगरीन होणं ही सामान्य बाब आहे. पण,अनियंत्रीत डायबेटीज हे देखील याचं कारण आहे.
मुंबई, 29 जानेवारी : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार 2000 ते 2019 या कालावधीत डायबेटिजमुळे (diabetes) होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 70 टक्क्यांनी वाढलं आहे. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे. बहुतेक लोक मधुमेहाचा सामना करत आहे. एकदा हा आजार झाला की पूर्णपणे बरा होत नाही, पण औषधोपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवता येतं. आता डायबेटिज लवकरात लवकर नियंत्रित करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रभावी असं औषध शोधलं आहे. दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी डायबेटिजसाठी अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांना एकत्रित करून नवीन औषध तयार केलं आहे. यामुळे मधुमेह लवकरात लवकर नियंत्रणात येईल, शिवाय त्यांना असलेला हृदयासंबंधी आजाराचा धोकाची कमी करता येऊ शकतो, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आज तक नं याबाबत वृत्त दिलं आहे. आयुर्वेदिक औषध बीजीआर-34 आणि अॅलोपॅथिक औषध ग्लिबेनक्लामीडचं सुरुवातीला वेगवेगळं आणि नंतर एकत्र परीक्षण करण्यात आलं. दोन्ही परीक्षणाची तुलना करण्यात आली. जर ही दोन्ही औषधं एकत्र दिली तर त्याचा दुप्पट परिणाम होत असल्याचं शास्त्रज्ञांना दिसलं. तीन टप्प्यात या औषधांच्या चाचण्या केल्या जात आहे. ज्याचा सुरुवातीच्या टप्प्यातील चाचणी दीड वर्षांनंतर पूर्ण झाली आहे आणि त्याचा परिणामही चांगला आला आहे. हे वाचा - अरे बापरे! फुफ्फुसातून गायब झाला तरी मेंदूत लपून बसतोय कोरोनाव्हायरस यामुळे इन्सुलिन वेगानं कमी होण्यास मदत होते. तसंच लेप्टिन हार्मोनही कमी होतं. इन्सुलिनवर जसा मधुमेह अवलंबून आहे. तसंच लेप्टिन हार्मोनवर लठ्ठपणा आणि मेटाबोलिझ्मसंबंधी परिणाम अवलंबून आहे. तसंच या औषधामुळे कोलेस्ट्रॉलमधील ट्राइग्लिसराइड्स म्हणजे व्हीएलडीएलची पातळीही कमी होते आहे. यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. तसंच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळीही वाढत असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा - जास्त पाणी पिणंही ठरू शकतं घातक, तहान नियंत्रणात ठेवण्याचे हे आहेत सोपे उपाय याआधी तेहरान युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनीदेखील हर्बल औषधांमुळे मधुमेही रुग्णांचा कोरोना संक्रमणाचा धोका कमी होई शकतो, याबाबत अभ्यास प्रसिद्ध केला होता.