JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दहा लोकांचं अन्न फस्त करणाऱ्या जगातल्या सर्वात लठ्ठ व्यक्तीचं झालं निधन, दिवसाला 115 समोसे खायचा

दहा लोकांचं अन्न फस्त करणाऱ्या जगातल्या सर्वात लठ्ठ व्यक्तीचं झालं निधन, दिवसाला 115 समोसे खायचा

आतापर्यंतचा जगातल्या सर्वात लठ्ठ व्यक्ती (fattest person) चं नुकतचं निधन (Death) झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याला श्वास घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यांचं वजन 412 किलो होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बर्मिंघम, 03 जानेवारी: बैठी जीवनशैली असणाऱ्या लोकांसाठी लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणामुळे लोकांमध्ये इतरही आरोग्याच्या तक्रारी उद्भवत आहेत. शरीराला व्यायाम नसणं आणि घरात वा ऑफिसमध्ये बसून बैठे काम करणं ही यामागची प्रमुख दोन कारणं आहे. दरवर्षी हजारो लोकं लठ्ठपणामुळे मृत्यू पावतात. अशीच एक दुःखद घटना समोर आली आहे. ब्रिटनमधील सर्वात लठ्ठ व्यक्तीचा नुकताच मृत्यू झाला आहे. त्याच्या मुलीनं याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या या 52 वर्षीय व्यक्तीचं नाव बॅरी ऑस्टिन असं असून लठ्ठपणामुळे त्याला सर्वत्र ओळखलं जातं. त्याला ब्रिटनमधील सर्वात लठ्ठ व्यक्तीचा पुरस्कारही मिळाला आहे. त्याचं वजन जवळपास 412 किलो होतं. या व्यक्तीनं 2012 मध्ये आपल्या प्रियसीसोबत लग्न करण्यासाठी वजन कमी केलं होतं. त्यावेळी ब्रिटनमधील लठ्ठपणाचा त्याचा मान दुसऱ्याला दिला होता. ब्रिटनमधील बर्मिंघममध्ये राहणाऱ्या या 52 वर्षीय बॅरी ऑस्टिनच्या मृत्यूची बातमी बर्मिंघॅम सिटीच्या ऑफिशियल ट्विटर पेजवर शेअर करण्यात आली आहे. ऑस्टिन हा ब्रिटनमधील आतापर्यंतचा सर्वात लठ्ठ व्यक्ती होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्याला श्वास घेण्यात अडचणी निर्माण होत होत्या. त्यांचा आता मृत्यू झाला असून त्यांचं वजन 412 किलो होतं. त्यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या पार्टनरची मुलगी डॅनी लुईसनं फेसबुकवर दिली आहे. डॅनीनं लिहिलं की, ऑस्टिनच्या जाण्यानं संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. ऑस्टिनच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलं नाही. ऑस्टिन दरदिवसाला 29 हजार कॅलरीज खात असे. म्हणजेच दहा सामान्य लोकं दिवसाला जेवढं अन्न खातात, तेवढं अन्न एकट्या ऑस्टिनला लागत असे. त्याचबरोबर तो दिवसाला 12 लिटर कोल्डींक्सही पित असतं. एका समोसेमध्ये साधारणतः 252 कॅलरीज असतात, याची तुलना जर आपण ऑस्टिनच्या जेवनाशी केली तर तो दरदिवशी 115 समोसे खात असे. सर्वात जास्त खादाड असल्यानं ब्रिटनमधील अनेक टीव्ही कार्यक्रमात यानं यापूर्वी हजरी लावली होती. तसेच त्यांनी ब्रिटनमधील ‘द फॅटेस्ट मॅन इन ब्रिटन’ नावाच्या एका कार्यक्रमात सहभागही घेतला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या