कोरोनावर अजुन औषध निघालेलं नाही, त्यामुळे हर्ड इम्युनिटीमुळे फायदा होईल असं म्हटलं जात होतं.
कोरोना विषाणूने जगभरात लाखो लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. सर्वजण त्याच्या लसीची चातकासारखी वाट पाहत आहेत, पण त्याला अनेक टप्प्यातून जावे लागणार असल्याने अजून खूप वेळ लागणार आहे. सर्वात जास्त चिंतेचे कारण हे आहे की अनेक जणांमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत तर अनेकांमध्ये लक्षणे दिसतच नाहीत, त्यामुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे त्यांना कळतच नाही आणि परिणामी हसता-बोलता त्यांचा मृत्यू होतो आहे. या रुग्णांमध्ये शरीरात विषाणूचे प्रमाण वाढत जाते आणि अचानक प्राणवायूची पातळी कमी होते आणि मृत्यू होतो. सामान्यपणे रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूची पातळी कमी झाली की त्याला श्वास घायला त्रास होतो, घाम येतो, बोलायला त्रास होतो, कधी कधी तर व्यक्ती बेशुद्ध होते. पण कोरोनाच्या बाबतीत प्राणवायूची पातळी कमी झालेली कळत नाही आणि ते चांगले दिसत राहतात आणि अचानक मृत्यूच्या दाढेत जातात. याच समस्येला हॅप्पी हायपोक्झिया किंवा साइलेंट हाइपोक्सेमिया म्हटले जाते. myupchar.com चे एम्समधील डॉ. केएम नाधिर यांनी सांगितलं, “प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन कमी झाल्याने डोकेदुखी, श्वास फुलणे या समस्या निर्माण होतात. जर परिस्थिती अधिक गंभीर झाली तर हृदय आणि मेंदू काम करण्याचे बंद करतो” साइलेंट हाइपोक्सेमिया साइलेंट हाइपोक्सेमिया म्हणजे व्यक्तीच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचणे कमी होते. विशेषतः डोंगराळ भागात उंचावर राहणाऱ्यांमध्ये हाइपोक्सेमियाची लक्षणं दिसून येतात कारण तिथे प्राणवायू कमी असतो, मात्र ते लोक जर खाली आले तर त्यांच्यातील लक्षणं कमी होतात. अपेक्षित तारखेच्या आधी जन्म झालेल्या बाळांमध्ये हाइपोक्सेमियाची लक्षणे दिसतात. याचं कारण म्हणजे वेळेपूर्वी प्रसूती झाल्याने त्यांची फुफ्फुसे पूर्ण विकसित झालेली नसतात. अवयवांची हानी होते कोरोना विषाणू असा आहे ज्यात रुग्णाला धोक्याचा अंदाजच येत नाही. म्हणूनच याला साइलेंट हाइपोक्सेमिया म्हटले जात आहे. संशोधकांच्यानुसार, कोरोनाच्या विषाणूची बाधा झाली आणि त्याने शरीराच्या अवयवांवर परिणाम केला, तरीही कुठलीच लक्षणे न दिसता अचानक मृत्यू होऊ शकतो. नव्या लक्षणांनी संशोधक चिंतेत myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. अजय मोहन यांच्यानुसार, कोरोना विषाणू मुख्यत्वे श्वसनसंस्था नाक आणि गळ्यावर परिणाम करतो. आता नव्या लक्षणांनी डॉक्टरांची चिंता वाढली आहे. कारण संसर्गामुळे रुग्णांमधील प्राणवायूचे प्रमाण खूप कमी होऊ लागले आहे आणि त्याची काहीच लक्षणं दिसत नाहीत. कोरोनाने बाधित या रुग्णांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण 70% पण दिसून येते तर काही जणांमध्ये हे 50% दिसते आहे. इतर आजारांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण इतके कमी कधीच नसते. विशेषतः फुफ्फुसांशी संबंधित इतर कुठल्याही आजारात तो एवढा कमी कधीच नव्हता आणि म्हणूनच ही समस्या गंभीर आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - हृदय आणि रक्ताचे आजार न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._