केस धुण्यासाठी कोणतं पाणी वापरावे
मुंबई, 11 डिसेंबर : बहुतेकांना हिवाळा ऋतू आवडतो. या ऋतूमध्ये विविध गोष्टी आणि फळे खाण्यासाठी उपलब्ध असतात, तसेच हा ऋतू व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठीही उत्तम असतो. हिवाळा हा ऋतू प्रवासासाठी आणि सहलीचा आनंद लुटण्यासाठी ओळखला जातो, हा ऋतू जितका मजेशीर असतो तितकाच या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो. म्हणूनच आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करायला हवा. टाईम्स ऑफ इंडिया च्या बातमीनुसार, हिवाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आपण क्रीम्स वापरतो, पण कोंड्यासारख्या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला केस धुवावे लागतात. हिवाळ्यात व्यवस्थित केस धुणे हे महिलांसाठी खूप कठीण काम असते. काही लोक यासाठी गरम पाणी वापरतात तर काही लोक केस धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करतात. पण, अनेकांना माहीत नसतं की, कोणत्या प्रकारचं पाणी आपल्या केसांसाठी जास्त फायदेशीर असते. जाणून घेऊया केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचे पाणी वापरावे. केसांवर गरम पाण्याचा परिणाम - हिवाळ्यात बहुतेक लोक आंघोळ करतात गरम पाण्याने केस धुतात. मात्र, सतत गरम पाण्याच्या वापरामुळे डोक्याची त्वचा कोरडी होते, ज्यामुळे खाज सुटते आणि कोंडा देखील वाढतो. हे वाचा - रात्री हे पदार्थ खाल्ल्याने उडते झोप आणि पडतात वाईट स्वप्न असे होण्याचे कारण म्हणजे गरम पाण्याने हायड्रोजन बंध तुटतात आणि आपल्या केसांची मुळे सुमारे 18 टक्के ढिली होतात. गरम पाण्यामुळे आपली डोक्याची त्वचा कोरडी होते ज्यामुळे मुळे कमजोर होतात. जर तुमचे केस कुरळे आणि निर्जीव होत असतील तर ते गरम पाण्यामुळेदेखील तसे होऊ शकतात. केसांचा जास्त गुंता होत असेल तर त्यालाही गरम पाणी, हे त्याचे प्रमुख कारण असू शकते. हे वाचा - उभे राहण्याचे ‘हे’ आहेत फायदे! टाळू शकता हृदयरोग गरम पाणी आपल्या केसांसाठी हानिकारक आहे, याचा अर्थ असा नाही की थंड पाणी केसांसाठी फार उपयुक्त असेल. थंड पाण्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते. थंड पाण्यामुळे डोक्याच्या त्वचेवरील नैसर्गिक ओलावा कमी होतो. हिवाळ्यात केस आणि डोक्याच्या त्वचेचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपले केस शॅम्पू करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणे. कारण, कोमट पाणी आपल्या डोक्याच्या त्वचेला स्वच्छ करून घाण आणि कोंढा काढून टाकण्यास मदत करते. शॅम्पू आणि कंडिशनर करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा, यामुळे ओलावा टिकून राहील.