JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Cleaning Hack : प्रेसवर गंज आणि जळण्याची चिन्हे दिसतायत? या सोप्या घरगुती टिप्स वापरून करा स्वच्छ

Cleaning Hack : प्रेसवर गंज आणि जळण्याची चिन्हे दिसतायत? या सोप्या घरगुती टिप्स वापरून करा स्वच्छ

कपडे प्रेस करण्यासाठी आणि कपड्यांमध्ये चमक आणण्यासाठी बहुतेक लोक प्रेस म्हणजेच इस्त्रीचा वापर करतात. काहीवेळा प्रेसच्या पृष्ठभागावर गंज लागल्याने किंवा जळण्याच्या खुणा झाल्यामुळे प्रेस योग्यरित्या काम करणे थांबवते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 जुलै : प्रेसचा वापर सर्व घरांमध्ये सामान्य आहे. कपडे प्रेस करण्यापासून ते कपडे सेट ठेवण्यापर्यंत इस्त्री खूप उपयुक्त ठरते. मात्र कधीकधी प्रेसच्या पृष्ठभागावर गंज किंवा जळलेले डाग होतात. त्यामुळे प्रेस नीट काम करू शकत नाही. तसेच या खुणांमुळे कपडेही घाण होतात. अशा परिस्थितीत, काही सोप्या पद्धतींनी प्रेस साफ करून, तुम्ही काही मिनिटांत गंज आणि जळलेल्या खुणा दूर करू शकता. कधीकधी पाण्यामुळे प्रेसच्या पृष्ठभागावर गंज येऊ लागतो. तर कधी कपडा चुकून जळला की, जळण्याची खूण प्रेसमध्येही चिकटते. त्यामुळे कपड्यांना इस्त्री करताना खूप त्रास होतो. प्रेसचा पृष्ठभाग साफ करण्याचे काही सोपे मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बेकिंग सोडा बेकिंग सोडा प्रेसच्या पृष्ठभागावरील हट्टी डाग सहजपणे काढू शकतो. यासाठी 1 चमचा बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट प्रेसच्या गंजावर लावा आणि 5 मिनिटांनी सॅंडपेपरने घासून काढा, गंज लगेच निघून जाईल. यानंतर प्रेस स्वच्छ कापडाने पुसून हवेत कोरडी करण्यासाठी ठेवा. वॉशिंग मशिनखाली बेस लावण्याचे काय आहेत फायदे? बेस घेण्याआधी ‘या’ गोष्टी नक्की लक्षात घ्या चुना आणि मीठ प्रेसच्या पृष्ठभागावरील गंज आणि जळलेल्या खुणा काढून टाकण्यासाठी आपण चुना आणि मीठदेखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात पाणी आणि मीठ मिसळून पेस्ट बनवा. आता प्रेसच्या पृष्ठभागावर पेस्ट लावा आणि काही वेळाने क्लिनिंग ब्रश किंवा सॅंडपेपरने घासून घ्या. यामुळे प्रेसवरील गंज सहजपणे काढला जाईल.

चूलच नव्हे तर स्वयंपाकघरातील गॅसही देतो आजारांना आमंत्रण; भयंकर आजाराचा धोका

संबंधित बातम्या

सॅंडपेपर प्रेसच्या पृष्ठभागावरील गंज किंवा जळलेल्या खुणा काढून टाकण्यासाठी सॅंडपेपरदेखील खूप प्रभावी आहे. यासाठी प्रेसचा पृष्ठभाग पाण्याने शिंपडून भिजवावा. नंतर पृष्ठभाग काही सॅंडपेपरने घासून घ्या आणि गरज भासल्यास मध्येच प्रेसवर पाणी शिंपडत राहावे. हे गंज आणि बर्नचे ट्रेस म्हणजेच जळाल्याचे डाग सहजपणे काढून टाकेल. आता प्रेस स्वच्छ कापडाने पुसून हवेत कोरडी करण्यासाठी ठेवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या