JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चर्चेत असलेल्या या 5 देशांची राजधानी सांगताना लोक गोंधळतात; चला तुमचं सामान्य ज्ञान तपासू

चर्चेत असलेल्या या 5 देशांची राजधानी सांगताना लोक गोंधळतात; चला तुमचं सामान्य ज्ञान तपासू

Quiz on Capitals of countries: चर्चेत असलेल्या या देशांच्या राजधान्यांची नावे तुम्हाला माहीत आहेत का? स्मार्ट नागरिक होण्यासोबतच कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीला या पाच प्रश्नांची उत्तरे माहित असणे आवश्यक आहे.

जाहिरात

चला तुमचं सामान्य ज्ञान तपासू

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 15 जानेवारी : अनेकदा आपल्याकडे असलेल्या सामान्य ज्ञानामुळे आपण चारचौघात उठून दिसतो. आजच्या काळात स्मार्ट नागरिक होण्यासाठी जगभरातील देशांच्या राजधानी जाणून घेतल्या पाहिजे. यासोबतच सामान्य ज्ञानाचे हे प्रश्न तुम्हाला सरकारी परीक्षेतही पाहायला मिळतील. या प्रश्नांची उत्तरे देऊन, तुम्ही तुमचे चालू घडामोडींचे ज्ञान देखील वाढवू शकता. या चाचणीत तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहिती आहेत? चला लगेच तपासू. प्रश्न: अलीकडे राजकीय हिंसाचारामुळे चर्चेत आलेल्या ब्राझील आणि पेरूच्या राजधानीचे नाव काय आहे? उत्तर: ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे आणि लिमा ही पेरूची राजधानी आहे. दोन्ही देश दक्षिण अमेरिका खंडाचा भाग आहेत. प्रश्नः सौदी अरेबियाच्या राजधानीचे नाव काय आहे, ज्या देशाने हज यात्रेकरूंची संख्या वाढवली आहे? उत्तर: लोक सहसा सौदी अरेबियाची राजधानी दुबई असल्याचे सांगातात. मात्र, सौदी अरेबियाची राजधानी रियाध आहे. दुबई हे संयुक्त अरब अमिरातीमधील एक भव्य शहर आहे जिथे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा देखील आहे. UAE ची राजधानी अबू धाबी आहे. वाचा - कोरोनापेक्षाही भयंकर! भविष्यातील संकटाचे हादरवून टाकणारे भयानक PHOTO प्रश्नः चीनशी वादग्रस्त असलेल्या तैवान बेटाच्या राजधानीचे नाव सांगा? उत्तर: तैवानच्या राजधानीचे नाव तैपेई शहर (ताई पेई शहर) आहे. आणि चीनच्या राजधानीचे नाव बीजिंग आहे.

प्रश्न: हिजाबच्या प्रात्यक्षिकांमुळे प्रसिद्ध झालेल्या इराणच्या राजधानीचे नाव काय आहे? उत्तरः तेहरान ही इस्लामिक देश इराणची राजधानी आहे. आणि त्याचा शेजारी देश इराकची राजधानी बगदाद आहे. प्रश्न: युक्रेन युद्धादरम्यान क्षेपणास्त्र पडल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पोलंडच्या राजधानीचे नाव सांगा? उत्तर: पोलंड हा युक्रेनचा शेजारी देश आहे ज्याची राजधानी वॉर्सा (Warsaw) आहे. नुकतेच रशियन बनावटीचे कथित क्षेपणास्त्र पडल्याने नाटोचे सदस्य देश चर्चेत आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या