JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / लग्नाआधी हसतहसत नवरा-नवरीने केलं एकमेकांचं मुंडण; कारण ऐकून तुम्ही आवरू शकणार नाही अश्रू

लग्नाआधी हसतहसत नवरा-नवरीने केलं एकमेकांचं मुंडण; कारण ऐकून तुम्ही आवरू शकणार नाही अश्रू

नवरा-नवरीने मुंडण केलं तेसुद्धा आपल्या लग्नात… साहजिकच कुणालाही धक्का बसेलच.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून: तरुण असो किंवा तरुणी लग्न (Wedding Video) हा दोघांच्याही आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. आपण आपल्या लग्नाच परफेक्ट दिसायला हवं, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी कपडे, मेकअप, दागिने यावर कितीतरी पैसे खर्च केले जातात. अशाच जर कोणत्या नवरा-नवरीने (Bride Groom) आपल्याच लग्नात मुंडण केलं असं सांगितलं तर साहजिकच कुणालाही धक्का बसेलच. सध्या असाच व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. लग्नाआधी नवरा-नवरीने मंडपातच मुंडण केलं आहे.  सुरुवातीला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. पण त्यामागील नेमकं कारण समजेल तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांतील अश्रूंना आवरू शकणार नाही.

प्रत्येक लग्नात वेगवेगळ्या विधी-परंपरा असतात. त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला हा एखादा विधी असावा असं वाटेल. पण दुसऱ्याच क्षणी असा विधी कसा असू शकतो आणि का? असा प्रश्नही पडेल. पण हा लग्नाचा कोणताही विधी नाही. तर नवरा-नवरीने हे मुंडण एका वेगळ्याच कारणासाठी केलं आहे. जे कारण तुम्हाला समजलं तर या दोघांचंही कौतुक वाटेल. हे वाचा -  चाणाक्ष वधूनं फोडलं नवरदेवाचं बिंग; वृत्तपत्रामुळं भर मांडवात मोडलं लग्न व्हिडीओत पाहू शकता, नवरा एका खुर्चीवर बसला आहे आणि नवरी माईकवर काहीतरी बोलते आहे. त्यानंतर ती आपल्या हाताने नवऱ्याच्या डोक्यावरील केस काढते. त्यानंतर नवरा नवरीच्या डोक्यावरील केस काढतो. नवरा-नवरीने हे पाऊल का उचचलं, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा व्हिडीओ तुम्ही आता नीट ऐका, त्यात आपलं मुंडण करण्याचा निर्णय घेतला हे नवरी जाहीर करते आणि त्यामागील कारण सांगते. याचं कारण आहे ते म्हणजे कॅन्सर. नवरा किंवा नवरीला नाही. तर या नवऱ्याच्या आईला कॅन्सर आहे आणि तिला साथ देण्यासाठी नवरा-नवरीने असा निर्णय घेता नाही. इतकंच नव्हे तर लग्नात आलेल्या पाहुण्यांना त्यांनी कॅन्सर उपचारासाठी दान करण्याचंही आवाहन केलं आहे. आपल्या लेकाचं आणि सुनेला असं पाहून कॅन्सरग्रस्त आईच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. तिने दोघांनीही आपल्या मिठीत घेतलं. त्यानंतर दोघांसोबत डान्सही केला. हे वाचा -  हेल्मेट सोडा याचं तर शीरच झालं गायब; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप या नवरा-नवरीचं सर्वांनी कौतुक केलं. नेटिझन्सही सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत आणि त्यांच्या हिमतीलाही दाद देत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या