JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / इथं लग्नाआधी नवरदेवाला सिद्ध करावा लागतो आपला पुरुषार्थ; नवरीच्या काकीसोबत ठेवावे लागतात शारीरिक संबंध

इथं लग्नाआधी नवरदेवाला सिद्ध करावा लागतो आपला पुरुषार्थ; नवरीच्या काकीसोबत ठेवावे लागतात शारीरिक संबंध

लग्नासाठी पुरुषांना द्यावी लागते भयंकर परीक्षा.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

केपटाऊन, 02 सप्टेंबर : लग्नाआधी (Wedding) वधू परीक्षा घेतली जाते हे आपल्याला माहितीच आहे. पूर्वी खूप कठीण वधू परीक्षा द्यावी लागत असे. आता काळ बदलला आहे. त्यामुळे तशी वधू परीक्षा किंबहुना वधू परीक्षा घेतली जातच नाही. शक्यतो हल्ली मुला-मुलींची एकमेकांची पसंतीस लक्षात घेतली जाते. पण तरी काही देशात लग्नाआधी अशा परीक्षा घेतल्या जातात फक्त वधूच्याच (Bride test) नाही तर वरांच्यासुद्धा (Groom test). आजच्या घडीला नवरा मुलगा पाहायला गेल्यावर सामान्यपणे त्याचं शिक्षण, नोकरी, पगार विचारला जातो. मुलींना आपल्या लग्नासाठी हँडसम, चांगली नोकरी-पगार असलेल्या जोडीदाराची अपेक्षा असते. पण आफ्रिकेमध्ये काही ठिकाणी पुरुषांना लग्नासाठी भलतीच नव्हे तर भयंकर परीक्षा द्यावी लागते. युगांडामधील बन्यानकोले जमातीत (Banyankole Tribe)  लग्नाआधी नवरदेवाला पुरुषार्थ सिद्ध करावा लागतो. नवरीची काकी नवरदेवाची लग्नाआधी पुरुषार्थ टेस्ट घेते. त्याच्यात किती बळ आहे, हे तपासलं जातं. यासाठी नवरीची काकीच नवरदेवासोबत शारीरिक संबंध ठेवते. यानंतर नवरीचीही व्हर्जिनिटी टेस्ट ती घेते. हे वाचा -  VIDEO - लग्नात नवरदेवाला बसला ‘जोर का झटका’; नवरीला पाहताच पुरता हादरला फुलानी जमातीत लग्नाआधी नवरदेवाला चोप दिला जातो. भरपूर लोक एकत्र येत त्याला मारतात. जेणेकरून तो लग्नाच्या योग्य बनेल. जर त्या पुरुषाने वेदना सहन केल्या नाहीत म्हणजे मारहाण केल्यानंतर त्याला वेदना असह्य असतील तर तो पुरुष मजबूत नाही असं समजलं जातं आणि मग ठरलेलं लग्नही रद्द केलं जातं. इथियोपियामध्ये तर पुरुषांना बुल जंम्पिंग करावं लागतं. ज्यात पुरुषांना आपले अंगावरील सर्व कपडे उतरवून बैलांच्या पाठीवर पळावं लागतं. बैलांच्या पाठीवर पळत जो आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल तोच तरुण लग्नायोग्य असल्याचं मानलं जातं. हे वाचा -  मेहुणीने सर्वांसमोरच केली नको ती मस्करी, नवरदेवालाही वाटली लाज; Video viral रिपोर्ट नुसार आफ्रिकामध्ये (Bizarre Practices of Africa) अशा काही विचित्र वर परीक्षा आजही होतात. ज्याचा अवलंब करणं दूर ऐकून, वाचूनच आपल्याला धक्का बसतो, इतक्या या विचित्र परंपरा (Strange Traditions) आहेत. आफ्रिकेतील बऱ्याच समाजातील लोक या परंपरांचं पालन करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या