नवी दिल्ली, 27 मार्च : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी, विकेंडला अनेक जण कुठेतरी बाहेर जाण्याचा, बाहेर जेवणााचा प्लॅन करतात. तर काही जण हॉटेलमधून पार्सल आणण्याचाही बेत आखतात. तुम्हीही आज रविवारी बाहेर जेवणाचा, डिनर डेटचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी काही हॉटेल्स मेजवानी ठरू शकतात. ठाणे, मुंबईत तुम्ही चविष्ठ, जबरदस्त अॅम्बियन्स असलेल्या हॉटेलमध्ये तुमचा संडे मस्त घालवू शकता. The Shelter - हे हॉटेल ठाणे पश्चिमेला असून इथे इंडियन, चायनिज, मुघलाई, सीफूड, मालवणी अशी बरीच व्हरायटी मिळते. तसंच संध्याकाळी 6.30 वाजता हे हॉटेल सुरू होतं. 1300 रुपयांत दोन जण इथे डिनर करू शकतात. या हॉटेलची होम डिलीव्हरी सर्विसही आहे. पत्ता - समर्थ सदन, गोखले रोड, नौपाडा, मल्हार सिनेमामागे, ठाणे पश्चिम - 400602 फोन - 022-25396000
Sai Shraddha Veg Treat - तुम्ही शुद्ध शाहाकारी हॉटेलच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बेस्ट ट्रिट ठरू शकते. साई श्रद्धा व्हेज ट्रिट हे पूर्णपणे शाहाकारी हॉटेल आहे. दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे सुरू असतं. या हॉटेलमध्ये तुम्ही जवळपास दोन जण 700 रुपयांत खाऊ शकता. तसंच होम डिलीव्हरीही आहे. Google वरही अनेकांनी या हॉटेलला चांगले रिव्ह्यू दिले आहेत. पत्ता - शांती कॉटेज, ठाकूर ब्लॉक, गोखले रोड, ठाणे - पश्चिम फोन - 022-25398381 Urban Tadka - नॉर्थ इंडियन डिशेससाठी हे हॉटेल पॉप्युलर आहे. पनीर बटर मसाला, कॉकटेल्स, बटर चिकन इथले बेस्ट सेलिंग डिशेस आहेत. होम डिलीव्हरी सुविधा आहे. रविवारी संध्याकाळी 6.30 ते रात्री 1 पर्यंत हॉटेल सुरू असतं. तसंच दुपारी 11.30 ते 3.30 पर्यंत सुरू असतं. 1400 रुपयांत दोन जण इथे लंच-डिनर करू शकतात. पत्ता - कोरम मॉल, चौथा मजला, मंगल पांडे रोड, कॅडबरी कंपाउंटजवळ, ठाणे - पश्चिम फोन - 0250-66739586
FoodCosta - FoodCosta कॅफे असून हे साउथ इंडियन, चायनिजसाठी पॉप्युलर आहे. तसंच व्हेज चीज रोल, चीज बर्गर, मोमोजही पॉप्युलर आहेत. होम डिलीव्हरी उपलब्ध असून हे कॅफे सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत सुरू असतं. 400 रुपयांत दोन जण इथे स्वादिष्ठ जेवणाचा आनंद घेऊ शकतात. पत्ता - भवानी अपार्टमेंट, शॉप 7, तलावपाळी, टीजेएसबी बँकेजवळ, ठाणे - पश्चिम फोन - 09022683251 Green Leaf - अनेकांनी ग्रीन लीफसाठी चांगले रिव्ह्यू दिले आहेत. चायनिज, नॉर्थ इंडियन, फास्ट फूडसाठी हे पॉप्युलर आहे. जवळपास 900 रुपयांत दोन जण इथे खाऊ शकतात. संध्याकाळी 7 ते 12.30 पर्यंत हे सुरू असतं. होम डिलीव्हरी सुविधाही आहे. पत्ता - बलवंत निवास, तलावपाळी मागे, ठाणे - पश्चिम फोन - 022-25446248