मुंबई 08 जुलै : जगभरात डायबेटिसच्या (Diabetes) रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बदलती जीवनशैली, वाढते ताण-तणाव आणि चुकीच्या आहारामुळे डायबेटिसचे रुग्ण वाढत आहेत. डायबेटिस हा आजार गुंतागुंतीचा समजला जातो. यामुळे अन्य शारीरिक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. किडनी (Kidney), हृदयाच्या (Heart) आरोग्यासाठी डायबेटिस धोकादायक मानला जातो. डायबेटिस नियंत्रणासाठी योग्य आहार (Diet) गरजेचा असतो. आहारात योग्य पदार्थांचा समावेश असेल तर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नॉर्मल राहते; पण अनेकदा डायबेटिसच्या रुग्णांसमोर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्याचं आव्हान असतं. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश केला म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात राहील असा प्रश्न रुग्ण नेहमीच विचारत असतात. न्युट्रिशन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रोजच्या आहारात राजगिऱ्याचा (Rajgira) समावेश केल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते. आरोग्याच्या दृष्टीनं राजगिऱ्याचे अनेक फायदे आहेत. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती दिली आहे. Health Tips : चिकन खाल्ल्यानंतर दूध पिणं सुरक्षित आहे का? हा आहे आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला डायबेटिसच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणासाठी योग्य आहार महत्त्वाचा असतो. ``डायबेटिसच्या रुग्णांसाठी राजगिरा खाणं फायदेशीर ठरू शकतं. चौलाई (Chaulai), अॅमरँथस (Amarnath) आदी नावानंदेखील ओळखला जाणारा राजगिरा डायबेटिससोबतच वजन नियंत्रणासाठी (Weight Control) उपयुक्त ठरतो,`` असं देशातील प्रख्यात न्युट्रिशन तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितलं. राजगिऱ्यात हायग्लायसेमिक इंडेक्स (High glycemic index) असतो. त्यामुळे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गव्हासोबत राजगिरा खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. राजगिरा खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेलं राहतं. त्यामुळे वारंवार खाण्याची गरज भासत नाही. राजगिऱ्यापासून अनेक पदार्थ तयार करता येतात. जर तुम्हाला बिस्किटं आवडत असतील तर राजगिऱ्याचं बिस्किटं खाणं उत्तम पर्याय ठरतो. तुम्ही घरच्याघरी राजगिऱ्याची बिस्किटं तयार करु शकता. राजगिऱ्याची बिस्किटं तयार करण्यासाठी राजगिऱ्याच्या आणि गव्हाच्या पिठात मनुका, गाजर, आलं आणि बेकिंग पावडर मिक्स करावी. त्यानंतर हे मिश्रण ओव्हनमध्ये बेक करुन घ्यावं. Healthy Foods: शरीरात रक्त कमी पडतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात; आहारात इतकासा करा बदल याशिवाय तुम्ही राजगिऱ्याचे कटलेट खाऊ शकता. डायबेटिसच्या रुग्णांसाठी हा पदार्थ खूप उपयुक्त मानला जातो. त्याचप्रमाणे गव्हाच्या पिठात राजगिरा मिक्स करून तुम्ही टिक्की तयार करुन खाऊ शकता. राजगिरा हा ग्लुटेन -फ्री (Gluten Free) असतो. राजगिऱ्यात कॅल्शियम, प्रोटिन आणि फायबर मुबलक प्रमाणात असतं. इतर धान्याच्या तुलनेत राजगिऱ्यात मुबलक लायसिन अर्थात अल्फा अमिनो अॅसिड असतं. डायबेटिसच्या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन प्राधान्यानं करणं गरजेचं आहे. त्यामुळे या रुग्णांनी राजगिऱ्याचे पदार्थ अवश्य खावेत. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. तसेच लठ्ठपणा कमी होतो.