JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रोज नाकात तुपाचे थेंब टाकल्यानं केसगळती, मायग्रेनच्या समस्येपासून होईल सुटका; जाणून घ्या साजूक तुपाचं महत्त्व

रोज नाकात तुपाचे थेंब टाकल्यानं केसगळती, मायग्रेनच्या समस्येपासून होईल सुटका; जाणून घ्या साजूक तुपाचं महत्त्व

डाएट करणारे लोक मात्र तुपाचं सेवन करणं टाळतात. परंतु, शुद्ध साजूक तुपाचा डाएटमध्ये योग्य प्रमाणात समावेश केला गेला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरू शकतं.

जाहिरात

तुपाचे फायदे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 03 ऑक्टोबर :  भारतात जवळपास सर्वच कुटुंबांमध्ये आहारात साजूक तुपाचा समावेश करण्यात येतो. चपाती असेल किंवा गरमागरम वरण-भात त्यावर तुपाची धार लावली नाही तर अनेकांना पोटभर जेवणही जातं नाही. चव वाढवण्यासाठी विविध अन्नपदार्थांत तूप हमखास टाकलं जातं. दुसरीकडे डाएट करणारे लोक मात्र तुपाचं सेवन करणं टाळतात. परंतु, शुद्ध साजूक तुपाचा डाएटमध्ये योग्य प्रमाणात समावेश केला गेला तर ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरू शकतं, असं डॉक्टर्स आणि आरोग्य विषयातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शुद्ध साजूक तुपाचा आहारात समावेश करण्यासह लहान मुलांच्या शरीराला मालिश करण्यासाठीही उपयोग होतो. परंतु, दररोज साजूक तुपाचे थेंब नाकात टाकणंही अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं. या क्रियेला आयुर्वेदातील पंचकर्मात नस्य म्हणतात. दररोज नस्य केल्यानं केसगळतीची समस्या रोखली जाते व त्वचेवर एक प्रकाराची चमकही येते. मायग्रेनसारख्या गंभीर समस्येपासून दिलासाही मिळवता येऊ शकतो. नस्य घेतल्यानं आणखी काय फायदे होतात हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हेही वाचा - जेवणात करा शेंगदाणा तेलाचा समावेश; ‘हे’ होतील फायदे आरोग्याच्या दृष्टीनं नस्य करण्याचे फायदे 7 प्राणायामा डॉट कॉम नुसार, नस्य क्रियेचे शारीरिकच नव्हे तर मानसिकही अनेक फायदे आहेत. रात्री झोपण्याच्या कोमट तूप त्याचे तीन-चार थेंब नाकाच्या दोन्ही नाकपुड्यांत टाकल्यानं स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होते. गाईचं शुद्ध साजूक तूप नाकात टाकल्यानं केसांना त्याचे फायदे मिळतात. दररोज नस्याची ही क्रिया केल्यानं केसगळतीची समस्या रोखली जाऊ शकते. शिवाय केसांची चांगली वाढही होऊ शकते. नस्य केल्यानं सर्दीपासून सुटका होते.नाक बंद झालेलं असेल किंवा कोरडं पडलं असेल तरी नस्याचा फायदा होवू शकतो. नस्य सायनसवरही प्रभावी नस्याकडे प्रभावी नैसर्गिक उपाय म्हणूनही पाहिलं जातं. सर्दी, खोकला आणि सायनससारख्या समस्यांपासून दिलासा मिळवण्यासाठी नस्याचा फायदा होऊ शकतो. अनेकदा नाक बंद झालेलं असेल किंवा इतर काही आजारांमुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नस्य केल्यानं बंद नाक उघडतं. हेही वाचा - मधुमेहाच्या रुग्णांनी मध खाल्ला तर चालेल का? कसा होतो हेल्थवर परिणाम नैराश्य होतं दूर, मेंदूतील नसांच्या पोषणासाठीही उपयुक्त आरोग्य विषयातील तज्ज्ञांच्या मते, नस्य केल्यानं दीर्घकाळापासून सुरू असलेली निद्रानाशाची समस्या सुटू शकते. शिवाय मेंदूतील नसांच्या पोषण व मजबूतीसाठी याचा फायदा होतो आणि शारीरिक क्रिया चांगल्याप्रकारे पार पडून अनेक गंभीर आजारांपासून सुटका होते. मायग्रेन आणि नैराश्य दूर करण्यासाठीही नस्य फायदेशीर आहे. दरम्यान, आयुर्वेदातही तुपाचे अनेक फायदे सांगितले आहेत. नाकात तुपाचे थेंब टाकण्याच्या क्रियेला आयुर्वेदातील पंचकर्मात नस्य असं म्हटलं जातं. नस्यानं शारीरिक नुकसान काहीच नसून, उलट याचे फायदेच अधिक आहेत. त्यामुळे दीर्घ काळापासून केसगळती, सर्दी, खोकला अशा समस्या असणाऱ्या लोकांनी दररोज नस्य करून आराम मिळवायला हवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या