मुंबई, 14 जून : आपल्या आंबट, गोड, तुरट अशा चवीमुळे जांभूळ सर्वानांच खूप आवडते. मात्र जांभूळ अनेक औषधी गुणधर्माने समृद्ध असलेले एक स्वादिष्ट फळ आहे (Black Jamun Has Many medicinal Properties). हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. जांभूळाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. जांभुळाचा गर आणि त्याच्या बियांमध्ये फायबर असते. जे वजन कमी करण्यास मदत करते (Black Jamun Helps To Weight Loss). त्याचबरोबर जांभूळ पचनसंस्था सुधारून अल्सरच्या समस्या टाळते. मधुमेहींसाठी जांभूळाचे सेवन करणे फायद्याचे आहे (Black Jamun Is Good For Diabetic Patient). जांभूळाच्या बियांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन हे दोन प्रमुख बायोएक्टिव्ह कंपाउंड असतात. जे इंसुलिनचे उत्पादन वाढवून रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतात. जांभूळाच्या बियांमध्ये इलॅजिक ऍसिड असते जे एक अतिशय शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे. हे उच्च रक्तदाब आणि त्याच्याशी संबंधित समस्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
weight loss tips : केवळ व्यायाम अन् डायटिंग नाही, ही घरकामं करूनही तुम्ही घटवू शकता वजनजांभुळामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात. जे शरीरातील बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. याशिवाय जांभुळामध्ये व्हिटॅमिन सीदेखील मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह यांसारख्या खनिजांनी समृद्ध असलेल्या जांभूळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते (Black Jamun Helps To Increase Hemoglobin Level In Blood) म्हणजेच रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
काय आहेत चिंचेच्या पानांचा चहा पिण्याचे फायदे? कोणासाठी ठरतो उपयुक्त?जांभूळ तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे (Black Jamun Is Good For Skin). याच्या बिया मुरुम आणि पिंपल्स दूर करण्यात मदत करतात. जांभूळाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. दात मजबूत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवून त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठीही जांभुळ खाणे उपयुक्त ठरते.