नवी दिल्ली 25 एप्रिल : मानवी शरीरात 70-75% पाणी (Water Constitutes 70-75% of Body) असतं त्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं. दररोज भरपूर पाणी प्या असं नेहमीच सांगितलं जातं. किती वेळा आणि कसं पाणी प्यायचं याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या जातात. तरीही पाणी पिण्याबद्दल काही शंका उपस्थित होतात. सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यावं असं म्हटलं जातं. पण दात घासण्याआधी पाणी पिणं चांगलं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दलच ‘लायब्रेट गुडकार्ट’ वेबसाईटवरील एका लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सकाळी उठल्याउठल्या दात न घासता पाणी पिणं चांगलं नाही असं अनेकांना वाटतं. कारण रात्रभर झोपेत आपल्या तोंडातील लाळेमध्ये (Salvia) काही जंतू (Bacteria) असतात असा समज आहे. मात्र हा फक्त समज आहे आणि त्यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. तुम्ही उठल्यावर दात न घासता पाणी प्यायलात तर ही लाळ पाण्याबरोबर तुमच्या पोटात जाते आणि तिथे जास्त प्रमाणात असलेल्या आम्ल म्हणजेच ॲसिडमुळे त्यातील जंतू (Bacteria) मरतात. त्यामुळे दात घासण्याआधी पाणी पिणं हे अजिबात धोकादायक नाही असं या लेखात म्हटलं आहे. Cholesterol Control: कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी ही एक गोष्ट आहे वरदान! आहारात प्रत्येकानं घ्यायला हवी जपानमध्ये सकाळी उठल्याउठल्या लगेचच दोन ग्लास पाणी पिण्याची पद्धत आहे. रात्रभराच्या झोपनंतर सकाळी उठल्यावर दात न घासता पाणी प्यायलाने तुमच्या शरीराला कोणताही अपाय होत नाही. रिकाम्यापोटी दोन ग्लास किंवा कमीतकमी एक ग्लास तरी पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. दररोज सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याचे काही महत्त्वाचे फायदे आहेत- 1. कोठा स्वच्छ होणे- (Clears Bowels) सकाळी पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला लगेचच शौचाला जायची इच्छा होते. त्यामुळे तुमचा कोठा स्वच्छ होतो आणि बद्धकोष्ठतेचा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. 2. प्रतिकारशक्ती वाढते- (Boosts Immunity) दररोज सकाळी पाणी प्यायल्यानं तुमची प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कीटाणू आणि रोगांशी लढण्याची तुमची ताकदही वाढते. 3. पचनक्रिया वाढवतं (Speeds up Metabolism) - सकाळी पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा वेग आणि पचनाचं प्रमाणही वाढतं.त्यामुळे अर्थातच चयापचयही वाढतं. यामुळे पूर्ण दिवसभर तुम्ही हायड्रेट राहता. क्रीम, लोशनची गरज पडणार नाही; नॅचरली ग्लोइंग स्कीनसाठी या 6 गोष्टी खायला सुरू करा 4. वजन कमी होण्यात मदत (Helps in weight loss-) सकाळी उठल्याउठल्या पाणी प्यायल्याने वजन अगदी लक्षणीयरित्या कमी होण्यासही मदत होते. सकाळीसकाळी पोटातली जागा पाण्यानं व्यापली जाते. त्यामुळे काही खायची इच्छा होत नाही. त्याचा परिणाम वजन कमी होण्यावर होतो. 5. डोकेदुखी आणि अर्धशिशीचा त्रास थांबतो (Prevents headaches and migraines)- रोज सकाळीसकाळी पाणी प्यायल्याने कोठा अगदी सहजपणे रिकामा होतो. त्यामुळे मोठ्या आतड्यामध्ये इन्फेक्शन होत नाही. तसंच डोकेदुखी आणि अर्धशिशीचा त्रास कमी होतो. 6. त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for Skin)- दररोज सकाळी नियमितपणे पाणी प्यायल्यास तुमच्या त्वचेच्या म्हणजे स्कीनच्या कॉम्प्लेक्शनमध्ये फरक पडतो. शरीरातील घाण म्हणजे टॉक्सिन्स आणि मृतपेशी बाहेर टाकले जातात आणि नवीन आणि नव्या पेशींमध्ये वाढ होते. अशाप्रकारे दात न घासता जरी तुम्ही सकाळी पाणी प्यायलात तरी नक्कीच काही फायदे होतात. त्यामुळे तुम्हाला जर दात न घासता पाणी प्यायची सवय असेल तर ती चांगली आहे.