JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उगीच नाही म्हणत डायरी लिहिली पाहिजे; आजच्या 'वेळ' नसलेल्या युगात अशी ठरते उपयोगी

उगीच नाही म्हणत डायरी लिहिली पाहिजे; आजच्या 'वेळ' नसलेल्या युगात अशी ठरते उपयोगी

Benefits Of Diary Writing: . अनेकवेळा जेव्हा आपण कोणतीही वेदना किंवा हृदयात (Heart) दडलेले काहीतरी सांगू शकत नाही, तेव्हा आपण ते कागदावर उतरवले पाहिजे. अनेक लोकांचा विश्वास आहे की, मनातील (व्यक्त/अव्यक्त) गोष्टी लिहिल्याने मनातील दु:ख बर्‍याच प्रमाणात कमी होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 07 एप्रिल : अनेकांना आपलं मन उघडपणे व्यक्त करता येत नाही किंवा कोणाला सांगता येत नाही. यासाठी आपण डायरी लिहिण्याची सवय लावू शकतो. अनेकवेळा जेव्हा आपण कोणतीही वेदना किंवा हृदयात (Heart) दडलेले काहीतरी सांगू शकत नाही, तेव्हा आपण ते कागदावर उतरवले पाहिजे. अनेक लोकांचा विश्वास आहे की, मनातील (व्यक्त/अव्यक्त) गोष्टी लिहिल्याने मनातील दु:ख बर्‍याच प्रमाणात कमी होतं. कदाचित याच कारणामुळे अनेकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल डायरी लिहायला आवडते. डायरी लिहिण्याची सवय खूप चांगली मानली जाते. दिवसभर आपल्यासोबत काय चाललं आहे ते प्रत्येकाने डायरीत लिहावं. तुम्ही दिवसभरात काय केलं ते दिसतं. दिवसभरात तुम्ही काय मिळवलं आणि काय गमावलं हे कळतं. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर लक्ष ठेवू शकाल. डायरी लिहिण्याचे फायदे जाणून (Benefits Of Diary Writing) घेऊया. डायरी लिहिण्याचे आश्चर्यकारक फायदे हलकं होतं अव्यक्त मन अनेकांना इच्छा असूनही त्यांच्या मनातील गोष्टी सांगता येत नाहीत. अनेकांना काही प्रकारच्या भीतीमुळे किंवा लाजेमुळे समोरच्या व्यक्तीशी बोलता येत नाही. तर अनेक जण स्टेज भीतीला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात डायरी लिहिण्याची सवय लावली तर तुम्ही तुमच्या भावना किंवा मनातील भाव लोकांना चांगल्या पद्धतीने सांगू शकाल किंवा त्यांच्याशी शेअर करू शकाल. एकाकीपणा वाटणार नाही आजच्या वेगवान डिजिटल जीवनात लोकांकडे वेळ कमी आहे. अशा वेळी तुमचे ऐकणारे किंवा वेळ देणारे कोणी तुमच्याकडे नसेल तर डायरी लिहिण्याची सवय लावा. डायरी लिहिल्याने तुमचा एकटेपणा बर्‍याच प्रमाणात कमी होईल आणि तुम्ही त्यात तुमचे मन शेअर करू शकाल. गोष्टी लक्षात ठेवणं सोपं तुमचं प्रोफेशनल लाइफ असो की पर्सनल लाइफ, बऱ्याचदा अनेक गोष्टी चुकतात. वाढदिवस असो की वर्धापनदिन, ऑफिस किंवा घरातील एखादा मोठा कार्यक्रम असो किंवा मीटिंग असो, लोक या गोष्टी विसरतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही प्रत्येक छोट्या गोष्टी डायरीत लिहायला सुरुवात कराल तेव्हा गोष्टी लक्षात राहतील. जरी तुम्ही गोष्टी विसरलात तरी, डायरी पुन्हा वाचल्यानंतर तुमची स्मृती ताजी होईल आणि तुम्हाला सर्व काही आठवेल. हे वाचा -  हाडांच्या दुखण्याला संधीवात समजण्याची चूक करू नका; हा गंभीर आजार झालेला असू शकतो भाषेवर पकड येते मोबाईल आणि लॅपटॉपच्या या जगात अनेकदा आपण चुकीचे आणि छोटे शब्द लिहू लागतो आणि टायपिंगमुळे अनेकांची लिहिण्याची सवय सुटते. विद्यार्थ्यांसाठी हे खूप वाईट ठरू शकते. अशा वेळी डायरी लिहिल्याने तुमची भाषेवरील पकड तर मजबूत राहील शिवाय तुमची लिहिण्याची सवयही सुटणार नाही. हे वाचा -  Weight Loss : पोटॅशियमनं समृद्ध या पदार्थांचा आहारातील समावेश झटपट करेल वजन कमी गोष्टींवर लक्ष केंद्रित अनेक लोक एका दिवसात अनेक आश्वासने देतात, अनेक संकल्प करतात पण यापैकी किती लोक पूर्ण करू शकतात? याचे कारण असे की, आपण अनेकदा गोष्टी विसरतो आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या गोष्टीही वाया जातात. तुम्ही तुमची उद्दिष्टे डायरीत लिहिलीत, तर जेव्हाही तुम्ही डायरी वाचाल तेव्हा तुम्हाला तुमचे ध्येय आठवेल आणि त्यामुळे तुम्ही गोष्टींवर चांगले लक्ष केंद्रित करू शकाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या