मुंबई, 22 फेब्रुवारी : भारताची खाद्यसंस्कृती अफाट आहे. आपल्याकडे अनेक प्रकारचे पदार्थ बनतात. प्रत्येकाच्या परंपरेनुसार, धर्मानुसार, आणि राज्यानुसार पदार्थ बदललतात. त्यांची चव बदलते. मात्र काही पदार्थ असे असतात. जे सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जरी बनत असले. तरी कोणत्याही पद्धतीती त्याची चव आणि लोकप्रियता अजिबात कमी होत नाही. असाच एक सर्वांच्या अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे बिर्याणी. आपल्याकडे बिर्याणीच्या चाहत्यांची (Biryani Lover) कमी नाही. बिर्याणी कोणत्याही पद्धतीची असो, कोणीही बनवलेली असो किंवा तिची चव कशीही असो. आपल्याकडे ती अगदी आवडीने खाल्ली जाते. आज आम्ही तुम्हाला राज्यानुसार बिर्याणीचे नाव आणि चव कशी बदलते याबद्दल माहिती देणार आहोत. बिर्याणीचे असंख्य प्रकार आहेत (Types Of Biryani). सामग्रीमध्ये थोडासा बदल करून वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी तयार केली जाऊ शकते. पाहूया बिर्याणीचे काही लोकप्रिय आणि निवडक प्रकार…
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास दिसतात ‘ही’ लक्षणं, वेळीच ओळखा ही धोक्याची घंटाकाश्मिरी बिर्याणी : (Kashmiri Biryani) बिर्याणीचा हा प्रकार जम्मू आणि काश्मीरमधील आहे. या बिर्याणीमध्ये तांदूळ, मटण, मसाले तर असतातच. मात्र त्यासोबत विशेषतः केशर आणि सुका मेवा प्रामुख्याने वापरला जातो. हैदराबादी बिर्याणी : (Hyderabadi Biryani) बिर्याणीचा हा प्रकार तेलंगणा येथील आहे. या बिर्याणीमध्ये तळलेले कांदे, चिकन, पुदिन्याची पाने आणि गुलाब पाण्याचा वापर केला जातो. ही बिर्याणी चवीला तिखट असते.
कोलकाता बिर्याणी : (Kolkata Biryani) बिर्याणीचा हा प्रकार वेस्ट बंगालमधील आहे. या बिर्याणीमध्ये माइल्ड मटण, बटाटे आणि मऊ उकडलेली अंडी वापरली जातात. थालासरी किंवा मालाबार बिर्याणी : (Thalasari or Malabar Biryani) बिर्याणीचा हा प्रकार केरळमधील आहे. या बिर्याणीमध्ये कमी लांबीचा तांदूळ, केरळी मसाले, तूप वापरले जाते. ही बिर्याणी मासे, प्रॉन्स किंवा चिकन वापरून तयार केली जाते.
मुघलाई बिर्याणी : (Moghlai Biryani) बिर्याणीचा हा प्रकार दिल्लीमधील आहे. या बिर्याणीमध्ये दह्यामध्ये मॅरीनेट केले चिकन, बदाम पेस्ट, तूप, मिरची आणि सुका मेवा वापरला जातो.
अवधी बिर्याणी : (Awadhi Biryani) बिर्याणीचा हा प्रकार उत्तर प्रदेशातील आहे. या बिर्याणीमध्ये चिकन, तांदूळ, खडे मसाले, दही आणि हळद प्रामुख्याने वापरली जाते. अंबूर बिर्याणी : (Ambur Biryani) बिर्याणीचा हा प्रकार तामिळनाडूमधील आहे. या बिर्याणीमध्ये सुकलेल्या मिरचीची पेस्ट आणि खडे मसाले महत्वाचे असतात. ही बिर्याणी वांग्याच्या भाजीसोबत खाल्ली जाते. बेअरी बिर्याणी : (Beary Biryani) बिर्याणीचा हा प्रकार कर्नाटकमधील आहे. या बिर्याणीचा फ्लेवर थोडा वेगळा असतो. यासाठी यामध्ये बडीशोप, नारळ, लवंग, दालचिनी, धने आणि तूप वापरले जाते.
रक्तदानाशी संबंधित अशा 10 मनोरंजक गोष्टी, ज्यातील सर्व तुम्हाला नक्कीच माहिती नसतीलकामरूपी बिर्याणी : (Kamarupi Biryani) बिर्याणीचा हा प्रकार आसाममधील आहे. या बिर्याणीमध्ये चिकन, वटाणे, गाजर, बीन्स, बटाटे आणि शिमला मिरची प्रामुख्याने वापरली जाते.
मेमोनी बिर्याणी : (Memoni Biryani) बिर्याणीचा हा प्रकार गुजरातमधील आहे. ही बिर्याणी टोमॅटो, बटाटे आणि नैसर्गिक रंग वापरून तयार केली जाते आणि ही खूप तिखट असते. मुंबई बिर्याणी : (Mumbai Biryani) महाराष्ट्रात या प्रकारची बिर्याणी बनवली जाते. ही बिर्याणी मटण, चिकन किंवा मासे कोणत्याही प्रकारात बनवली जाते. आपापल्या सोयीनुसार ही बिर्याणी तिखट किंवा कमी तिखट प्रकारात बनवतात. यामध्ये तळलेले कांदे आणि खडे मसाले प्रामुख्याने वापरतात. गोवन फिश बिर्याणी : (Goan Fish Biryani) बिर्याणीचा हा प्रकार गोव्यातील आहे. ही बिर्याणी मॅकरेल फिशपासून बनवली जाते आणि यामध्ये मसाले, किसलेले नारळ, कोकम वापरले जाते. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)