JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'Coronavirus वर मात अँटीबॉडीज के भरोसे...' नाही चालणार! वाचा काय म्हणताहेत तज्ज्ञ

'Coronavirus वर मात अँटीबॉडीज के भरोसे...' नाही चालणार! वाचा काय म्हणताहेत तज्ज्ञ

कोरोनाबाबत दुसऱ्यांदा संसर्गाचा धोका नाही ही बाब अंतिम सत्य मानणे चुकीचं आहे. विविध संशोधनांमधून ही बाब समोर आली आहे.

जाहिरात

सध्या 639 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 356 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 25 डिसेंबर : एकदा कोरोनाचा (coronavirus) संसर्ग (infection) होऊन गेला, की मग निश्चिती. कारण अँटीबॉडीजचं (antibodies) सुरक्षाकवच वाचवणार, आता आपल्याला काहीच होऊ शकत नाही. अशा विविध भ्रमांमध्ये असाल तर वेळीच सावध व्हा. एका तज्ज्ञांचं (expert) मत वाचून तुमचे डोळे नक्की उघडतील. Indian Express नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोनाचा एकदा संसर्ग होऊन गेल्यावर ती व्यक्ती पुन्हा एकदा संसर्गाला बळी पडल्याच्या बातम्या आता येत आहेत. मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटल इथल्या डॉ. अनिता मॅथ्यू म्हणतात, ‘‘कोरोनाचा एकदा संसर्ग झाल्यावर निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज किती काळ टिकतात हे कळण्यासाठी अजून खूप संशोधन होण्याची गरज आहे. आणि या अँटीबॉडी पुन्हा एकदा संसर्ग झाल्यावर लढण्यासाठी सक्षम आहेत का हेसुद्धा पाहिलं पाहिजे. त्या पुढे म्हणतात, ‘‘संशोधक सतत सांगत आहेत, की अँटीबॉडीजचं आयुष्य आणि क्षमता सखोलपणे तपासत राहण्याची गरज आहे. यात ज्यांना अलीकडेच कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा लोकांच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या पाहिजेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात (ICMR) ज्यांच्यावर उपचार झालेत त्यांच्यात दुसऱ्यांदा संसर्ग  होतोय अथवा नाही यावर नजर ठेऊन आहे. त्यातील दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्यांचा अभ्यासही इथले संशोधक करत आहेत. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की अँटीबॉडीजवर विसंबून चालणार नाही. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन’ म्हणते त्याप्रमाणे, या अँटीबॉडीज म्हणजे काही ‘इम्युनिटी पासपोर्ट’ नाहीत.’’ “अँटीबॉडीजविषयी कुठलेच फॅक्ट बेस्ड पुरावे समोर आलेले नाहीत. त्याऐवजी आपण आता लसीकरणाच्या टप्प्याबद्दल बोललं आणि समजून घेतलं पाहिजे.” असंही डॉ. मॅथ्यू बजावतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या