JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Marathi Actress: सध्याच्या आघाडीच्या या नायिका एकेकाळी एकाच मालिकेत करायच्या कामं; ओळखा ही सिरीयल

Marathi Actress: सध्याच्या आघाडीच्या या नायिका एकेकाळी एकाच मालिकेत करायच्या कामं; ओळखा ही सिरीयल

सध्या टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या आघाडीच्या नायिका एकेकाळी एकाच मालिकेत काम करत होत्या. कोण आहेत त्या अभिनेत्री आणि ती मालिका जाणून घ्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 जुलै:  सध्या मराठी टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहेत. मालिकेच्या एकाहून एक सुंदर आणि टॅलेंटेड नायिकांमध्ये देखील चढाओढ पाहायला मिळत असते. अनेक अभिनेत्री या एकमेकींच्या फार चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. अभिनय क्षेत्रात आल्यापासून त्यांनी एकमेकींचा प्रवास पाहिला आहे. अशीच एक अभिनेत्रींची जोडी आहे ती म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, प्रिया मराठे आणि अंकिता लोखंडे. तिघींनी एकत्र करिअरला सुरुवात केली. तिघीही टेलिव्हिजनवर सध्याच्या आघाडीच्या नायिका ठरल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का याच आघाडीच्या नायिका एकेकाळी एकाच मालिकेत काम करत होत्या. अर्चना, वर्षा आणि वैशालीची ही जोडी तुम्हाला आठवतेय का? झी टीव्ही वरील पवित्र रिश्ता मालिकेतील तिघींची ही जोडी चांगलीच गाजली होती. दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत असलेली पवित्र रिश्ता ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. मालिकेत अर्चना मानवची म्हणजेच सुशांत आणि अंकिताची जोडी हिट झालीच मात्र मालिकेत अनेक मराठी कलाकारही पहायला मिळाले होते. अभिनेत्री प्रिया मराठेने मालिकेत अर्चनाच्या मोठ्या बहिणीची भूमिका निभावली होती.  तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील मालिकेत प्रमुख भूमिकेत होती. ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांनी अर्चनाच्या आईची भूमिके केली होती.   तर अभिनेते किशोर महांबोले यांनी अर्चनाच्या वडिलांची भूमिका केली होती. हेही वाचा -  Mrunmayee Deshpande: ‘इकडे एक्सप्रेशन कितीही वाईट असलं तरी…’, पुरस्कार मिळताच असं का म्हणाली मृण्मयी देशपांडे

पवित्र रिश्ता मालिकेतील या तिघी अभिनेत्री आजही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. स्ट्रगलींच्या काळात तिघींनी एकमेकींना साथ दिली आहे. आज तिघीही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून टेलिव्हिजन तसेच सिनेमातही काम करत आहेत. अनेक वर्षांनी तिघींचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं प्रेक्षकांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पवित्र रिश्ता मालिकेच्या सेटवरील हा फोटो आहे.

तिघींच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झालं तर अभिनेत्री अंकिता लोखंडेची ‘पवित्र रिश्ता 2’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर अंकितानं विक्की जैनबरोबर लग्नही केलं. तर मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत प्रमुख नायिकेची भूमिका साकारत आहे. तिच्या नेहा या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तर अभिनेत्री प्रिया मराठे सध्या स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत आहे. प्रियाच्या मोनिका या पात्रालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  तर अभिनेत्री सविता प्रभूणे स्टार प्रवाहवरील स्वाभिमान मालिकेत मोठी आई म्हणून दिसत आहेत तर अभिनेते किशोर महांबोले हे आई कुठे काय करते मालिकेत आप्पांची भूमिका साकारत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या