JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / VIDEO: 'या' अमेरिकन बाबूचा डान्स पाहिला का? बॉलिवूड गाण्यांवर धरतो भन्नाट ठेका

VIDEO: 'या' अमेरिकन बाबूचा डान्स पाहिला का? बॉलिवूड गाण्यांवर धरतो भन्नाट ठेका

सोशल मीडिया हा जगभरातील सामान्यांना आपल्या अंगातील कलागुण दाखवण्याचा मंच देतो. आता सोशल मीडियावर एका विदेशी बाबूचा बॉलिवूड डान्स भारतीयांना कमालीचा आवडतो आहे. पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या (Internet and social media) जगात कधी काय व्हायरल होईल याचा काय नेम नसतो. अनेक जगावेगळ्या, विचित्र विक्षिप्त गोष्टी नेटिझन्स तत्परतेनं उचलून धरतात. आता एक व्हीडिओ व्हायरल (viral video) होतो आहे, तो अमेरिकेतल्या एका डान्सवेड्या माणसाचा. हा अमेरिकन भारतीय सोशल मीडिया युजर्समध्ये कमालीचा लोकप्रिय होतो आहे. आता पन्नाशीत असलेला रिकी पॉन्ड राहतो वॉशिंग्टनमध्ये (Washington) . त्याला दोन मुलं आहेत. या बच्च्यांना सोबत घेऊन तो व्हीडिओज बनवत असतो. तसं तर इन्स्टाग्रामवार (Instagram) हजारो डान्स व्हीडिओज आहेत. पण रिकी गर्दी खेचतो आहे. का? तर तो बॉलिवूड सॉंग्ज (Bollywood songs) आणि इतरही अनेक म्युझिक इंडस्ट्रीतली वैशिष्ट्यपूर्ण गाणी निवडत त्यांच्यावरच धमाल डान्स सादर करतो. त्यातून त्याची आणि त्याच्या अकाउंटचीही लोकप्रियता वेगात वाढते आहे.

संबंधित बातम्या

मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये रिकीनं अनुराग बासूच्या लुडो सिनेमातील ‘ओ बेटाजी…’ गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स दिला होता. हा व्हीडिओ तुफान चालला. याशिवाय त्यानं हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉर सिनेमातल्या घुंगरू टूट गये गाण्यावरही नाच केला. रिकी बॉलिवूड म्युझिकशिवाय इतरही भाषांतल्या गाण्यांवर आपल्या मस्त अदा पेश करत असतो. तामिळ, (Tamil) पंजाबी (Punjabi) अशा इतरही भारतीय भाषांमधील गाण्यांवर तो  ठेका धरतो. त्याची डान्स स्टाईल आणि बच्च्यांसोबतची जुगलबंदी लोक उचलून शरताना दिसत आहेत. त्यांचं पण वेगात लोकप्रिय होतं आहे. त्याच्या एकेका व्हीडिओला नव्वद हजारांहून अधिक लाईक्स मिळत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या