JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बर्फात अडकली अँब्युलन्स; रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कसे केले अथक प्रयत्न पाहा VIDEO

बर्फात अडकली अँब्युलन्स; रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कसे केले अथक प्रयत्न पाहा VIDEO

एका 70 वर्षांच्या आजोबांना कुल्लू येथील रुग्णालयात अँब्युलन्समधून (Ambulance) नेत असताना लाहौल स्पिती इथल्या रस्त्यात बर्फात गाडी रुतली.. कशी काढली पाहा VIDEO, रम्य वाटणाऱ्या हिमालयातल्या या भागाच्या सद्यस्थितीचा अंदाज येईल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लाहौल स्पिती, 7 जानेवारी : हिमाचल प्रदेशातील हिमवर्षाव (Snowfall) हा जसा तेथील नागरिकांसाठी सुखावह असतो, तसाच तो अडचणी वाढवणारा देखील ठरतो. अशीच एक घटना नुकतीच लाहौल स्पितीमध्ये (Lahul Spiti) घडली. केलांग येथील एका 70 वर्षीय वृध्द रुग्णास कुल्लू येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून (Ambulance) नेत असताना लाहौल स्पिती येथे ही अँब्युलन्स बर्फात अडकली. परंतु अँब्युलन्समधील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन रुग्णास रुग्णालयापर्यंत पोहोचवले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला असून, त्यातून लाहौलमधील सद्यःस्थितीचा अंदाज येतो. नाॅर्थ पोर्टलपासून लाहौलकडे जाण्यासाठी ही अँब्युलन्स थोडीशी पुढे जाताच ती 3 फूट खोल बर्फात अडकली. या अॅब्युलन्समध्ये ड्रायव्हर गोपाल बोध, फार्मासिस्ट जयललिता आणि लक्ष्मी चंद नावाचा एक कर्मचारी होता. अॅब्युलन्स अडकताच या तिघांनी पुढे जाण्याचा निर्णय घेत गाडीतून फावड्याच्या सहाय्याने बर्फ (Snow) हटवण्यास सुरुवात केली. पारा होता उणे उणे 5 अंश सेल्सिअस तापमानात हे तिघेही अक्षरशः कुडकुडत होते. परंतु, तरी देखील बर्फ हटवण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्यांदा गोपालने बर्फ हटवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लक्ष्मी चंदने. हे दोघेही थकून गेल्यानंतर फार्मासिस्ट जयललिता यांनी महिला शक्तीचे प्रदर्शन करीत हातात फावडे घेऊन बर्फ हटवण्यास सुरुवात केली. हे जसा जसा बर्फ हटवत होते, तशी गाडी पुढे जात होती. यापध्दतीने त्यांनी सुमारे 4 किलोमीटरचे अंतर कापले. या स्थितीमुळे कुलूला (Kullu) पोहोचण्यासाठी त्यांना 2 तास अधिक लागले. त्यानंतर कटरच्या सहाय्याने बर्फ हटवणारी बीआरओची मशीनरी त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या लोकांनी केलेल्या या प्रयत्नांमुळे रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळाले असून आता रुग्णाची स्थिती चांगली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लाहौलमध्ये सर्वाधिक हिमवर्षाव लाहौलमध्ये गेल्या चार दिवसांत जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) झाली आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मनाली-केलांग-लेह महामार्ग बर्फवृष्टीमुळे ठप्प झाला आहे. स्थानिक रस्ते देखील बंद आहेत. लाहौलचा अन्य भागांशी असलेला संपर्क हिमवृष्टीमुळे तुटलेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या