JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Snakes Facts : मृत्यूनंतरही धोकादायक ठरू शकतो साप, शिकार पचवण्यात लागतात काही दिवस

Snakes Facts : मृत्यूनंतरही धोकादायक ठरू शकतो साप, शिकार पचवण्यात लागतात काही दिवस

Snakes Facts : काही साप त्यांच्या मृत्यूनंतरही धोकादाय ठरु शकतात हे तुम्हाला माहिती आहे का?

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 डिसेंबर :  सापाचं नाव ऐकताच अनेकांना भीतीने घाम फुटतो. साप समोर आला तर त्याला पाहून बऱ्याच जणांचा थरकाप उडतो. पृथ्वीवर सापांच्या हजारो प्रजाती आढळतात. त्यापैकी काही सापच इतके विषारी असतात, की त्यांच्या चाव्यामुळे प्राणी क्षणात मरू शकतो. जगातल्या सर्वांत धोकादायक सापांच्या यादीत ‘इनलँड तैपान’ हा सर्वांत वरच्या स्थानावर आहे. या सापाचा एक चावा 100 माणसांचा जीव घेण्यास सक्षम असतो. हा साप फक्त ऑस्ट्रेलियातच आढळतो. जगात सापांच्या सुमारे 3000 प्रजाती आढळतात. परंतु केवळ 200 प्रजाती अशा आहेत, ज्यांच्या दंशामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. जगातला सर्वांत वजनदार साप अ‍ॅनाकोंडा हा असून, त्याचं वजन 595 पौंड म्हणजेच 270 किलो असतं. त्याची लांबी 16 फुटांपेक्षा जास्त असते. हा साप एखाद्या माणसाची शिकार करून त्याला गिळून टाकू शकतो. ब्रिस्टल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिस्ट्रीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘इनलँड तैपान’ साप चावल्यानं 110 मिलीग्राम विष बाहेर पडतं. ते 100हून अधिक माणसं किंवा अडीच लाख उंदीर मारण्यास सक्षम असतं. थंडीत हाता-पायाला मुंग्या येतायत? दुर्लक्ष करू नका; पडू शकतं महागात मेल्यानंतरही साप धोकादायक सापांच्या डोळ्यांना पापण्या नसतात आणि त्यांच्या तोंडात दात नसतात. यामुळेच साप आपली शिकार गिळतात. सापांचे जबडे आणि त्वचा इतकी लवचीक असते, की ते त्यांच्या डोक्यापेक्षा मोठी शिकार सहज गिळू शकतात. सापांना एक शिकार पचवण्यासाठी 3 ते 5 दिवस लागतात. कारण त्यांची पचनशक्ती संथ असते. मृत सापाचा जबडा त्याच्या मृत्यूनंतर काही तासांनीही चावू शकतो. त्यामुळे त्यापासून दूर राहणं योग्य आहे. सापांना बाह्य कान नसतात; पण अंतर्गत कान असतात. ते वास घेण्यासाठी त्यांच्या जिभेचा वापर करतात. जगात विषारी सापांच्या एकूण 725 प्रजाती आहेत. त्यापैकी केवळ 250 प्रजाती मानवांवर हल्ला करतात. किंग कोब्रा हा आशियातला सर्वांत विषारी साप आहे. तो खूप बुद्धिमान असतो. आपल्या देशात तो नाग म्हणून ओळखला जातो. तुमच्यासोबतही कधी असं घडलंय का? तर समजून जा तुमच्या आजूबाजूला आहे आत्मा साप माणसाला घाबरतात. त्यामुळेच ते माणसांकडून जास्त प्रमाणात मारले जातात. एका वर्षात 40 हजारांहून अधिक व्यक्ती सापाच्या विषाने मरण पावतात. सापांमध्ये दोन प्रकारचं विष आढळते. यापैकी एक प्रकारचं विष माणसाच्या मज्जासंस्थेवर हल्ला करतं, तर दुसरं पेशी नष्ट करतं. सापांनाही माणसांप्रमाणे उलट्या होतात. अनेकदा धोका जाणवल्यानंतर साप उलट्या करून शरीराचं वजन कमी करतात आणि वेगाने धावतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या