JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Robot Artist : ब्रिटनच्या संसदेत आली रोबो आर्टिस्ट; राणी एलिझाबेथसह काढलीत अनेकांची चित्र

Robot Artist : ब्रिटनच्या संसदेत आली रोबो आर्टिस्ट; राणी एलिझाबेथसह काढलीत अनेकांची चित्र

ब्रिटनमध्ये जगातला पहिला अल्ट्रारिअलिस्टिक ह्युमनॉइड रोबो आर्टिस्ट तयार करण्यात आला आहे. एका महिलेच्या स्वरूपात त्या रोबोला तयार करण्यात आलंय.

जाहिरात

रोबो आर्टिस्ट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 ऑक्टोबर :  चालताबोलता रोबो हे तंत्रज्ञानाच्या विकासाचं उत्तम उदाहरण आहे. आजपर्यंत एखादं काम सोपं करण्याच्या दृष्टीनं रोबोटिक तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग झाला आहे. विविध प्रकारचे रोबो तयारही करण्यात आले आहेत; मात्र एखाद्या रोबोला संसदेत उत्तर देण्यासाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ असेल. ब्रिटनच्या संसदेत मंगळवारी (11 ऑक्टोबर) एका रोबो आर्टिस्टला बोलावण्यात आलं होतं. रोबोमुळे कला क्षेत्राला निर्माण होणाऱ्या धोक्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी त्या रोबोला आणण्यात आलं होतं. ब्रिटनमध्ये जगातला पहिला अल्ट्रारिअलिस्टिक ह्युमनॉइड रोबो आर्टिस्ट तयार करण्यात आला आहे. एका महिलेच्या स्वरूपात त्या रोबोला तयार करण्यात आलंय. ब्रिटनचे गणितज्ज्ञ एडा लवलेस (Ada Lovelace) यांच्या नावाच्या आधारे तिचं नाव Ai Da असं ठेवण्यात आलं आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा रोबोला तयार केला आहे. या रोबोने आतापर्यंत अनेक चित्र काढली आहेत. त्यात इंग्लंडच्या दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या चित्राचा समावेश आहे. चित्रांबरोबरच तिनं काही कविताही केल्या आहेत. यामुळे कलाक्षेत्राला धोका निर्माण होतो आहे का, अशी शंका उपस्थित होत होती. त्या पार्श्वभूमीवर ब्रिटनच्या संसदेत रोबोला बोलावण्यात आलं होतं. हेही वाचा - राणी एलिझाबेथनंतर ‘कोहिनूर’च्या वारसदाराचं रहस्य वाढलं, वाचा कुणाला मिळणार मुकुट! या रोबोमुळे कलाक्षेत्रावर वाईट परिणाम होतो आहे असा आरोप झाल्यामुळे चौकशीसाठी संसदेत तिला बोलावण्यात आलं. तिथे काळ्या रंगाच्या केसांची Ai-Da केशरी रंगाचा ड्रेस घालून आली होती. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची तिनं उत्तरं दिली. तिच्यासोबत मुख्य प्रकल्प अधिकारी व कलादालनाचे संचालक एडन मिलर हेही उपस्थित होते. हाउस ऑफ लॉर्ड्स कम्युनिकेशन अँड डिजिटल कमिटीनं त्या टीव्ही कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. माणसांच्या तुलनेत तुमची कला कशी वेगळी आहे, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. तेव्हा “मी कॉम्प्युटर प्रोग्राम आणि अल्गोरिदमवर आधारित आहे. मी जिवंत नसले, तरी कला सादर करू शकते,” असं तिनं सांगितलं. संसदेतल्या चौकशी समितीने रोबोप्रमाणेच कला क्षेत्रातल्या तज्ज्ञांची मतंही ऐकली. त्यावरून तंत्रज्ञानामुळे कलाकारांचं नुकसान होतं आहे का हेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रोबो असूनही चित्रं कशी काढते व कविता कशी करते हे समितीनं समजून घेतलं. त्यावर स्पष्टीकरण देताना तिनं सांगितलं, की डोळ्यांतले कॅमेरे आणि रोबोटिक हातांमुळे कॅनव्हासवर ती पेंटिंग करू शकते. तसंच वाचलेल्या सगळ्या लेखनाची समीक्षा करून त्यावरून ती कविता तयार करते.

या रोबोनं काढलेली चित्रं आतापर्यंत अनेक कलादालनांमध्ये ठेवण्यात आली आहेत. मानवी आकारातल्या या रोबोला खास कला सादर करण्याच्या दृष्टीनेच तयार करण्यात आलं आहे; मात्र त्याचा कलाकारांवर विपरित परिणाम होतोय का या भीतीमुळे रोबोची चौकशी करण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या