नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : कोरोना महामारीनं लोकसंपर्कावर अनेक बंधनं आणली. नागरिकांचं सामाजिक जीवन संपवलं. तब्बल दोन वर्षं समाजापासून अलिप्त राहण्याची ही सवय अनेक दृष्य-अदृष्य परिणामांना कारणभूत ठरते आहे. एकटेपणा, नैराश्य, लहान मुलांच्या स्वभावामधली चिडचिड यात या काळात कमालीची वाढ झाली. याच काळाच वर्क फ्रॉम होम संस्कृती रुजली. यानं घरच्यांना मिळणारा क्वालिटी टाईम कमी झाला. ऑफिसचा ताण घरी येऊ लागला. या व्यतिरिक्त वर्क फ्रॉम होम संस्कृतीचा आणखी एक भयंकर दुष्परिणाम नुकताच समोर आलाय. घरून काम करण्याच्या सवयीमुळे यूकेमध्ये नागरिकांना पॉर्न व्हिडिओ पाहण्याचं (Rise In Porn Addiction In UK) व्यसन लागलं आहे. इंडिया डॉट कॉमनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. ब्रिटनमध्ये पॉर्नच्या व्यसनाधीनतेत वाढ होत आहे. यूकेमध्ये घरून काम करण्याच्या सवयीमुळे पॉर्नचं व्यसन वाढलं आहे. या समस्येकरता वैद्यकीय मदत घेणाऱ्यांची संख्या दुपटीनं वाढल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे, असं डेली मेलनं म्हटलंय. या संदर्भातली आकडेवारी थक्क करणारी आहे. ब्रिटनमधील सर्वांत मोठं सेक्स अँड पॉर्न अॅडिक्शन क्लिनिक असलेल्या लंडन येथील लॉरेल सेंटरच्या (Laurel Center, London) म्हणण्यानुसार, दिवसातले 14 तास पॉर्न बघणारे व घरून काम करणारे नागरिक वैद्यकीय मदतीसाठी आता येत आहेत. घरून काम करण्याच्या सोयीमुळे (Side Effect Of Work From Home Culture) दिवसातला अधिकाधिक वेळ लोकं कम्प्युटरसमोर घालवू लागले आहेत. त्यामुळे पॉर्न पाहण्यासाठी रात्री घरी पोहोचेपर्यंत वाट पाहावी लागत नाही. त्यासाठीच्या भरपूर संधी उपलब्ध असतात, असं सेंटरच्या वैद्यकीय संचालक पॉला हॉल यांनी सांगितलं आहे. WFH संपलं पण ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नाही? टेन्शन नको; ‘या’ क्षेत्रांमध्ये घरूनच करता येईल काम या लॉरेल सेंटरमध्ये 2019 मध्ये 950 पॉर्न अॅडिक्ट लोकांवर उपचार करण्यात आले. यंदाच्या वर्षी मात्र यात भरपूर वाढ झाल्याचं आकडेवारी सांगते. 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांतच इथे 750 पॉर्न व्यसनाधीन लोकांवर उपचार करण्यात आले. यंदाच्या वर्षी क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांवर अधिक दक्षतेनं उपचार करण्याची गरज असल्याचं हॉल यांनी सांगितलं आहे. पॉर्नचं व्यसन लागलेल्या रुग्णांवर उपचारांसाठी 2019मध्ये इथले डॉक्टर महिन्याला 360 तास वेळ देत होते. दीर्घकाळ Work From Home करताय? वेळीच सावध व्हा! ह्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष आता त्यात वाढ होऊन त्यांना महिन्याला 600 तास रुग्णांसाठी द्यावे लागतात. पॉर्नोग्राफी (Pornography) हा सध्याचा काळजीचा विषय आहे. विशेषतः तरुणाईला यानं विळखा घातला आहे. कोरोना महामारीनं याला खतपाणी घालण्याचं काम केलं. या काळात अनेक कंपन्यांनी घरून काम करण्याची परवानगी दिली. कोरोना कमी झाल्यावरही अनेक कंपन्यांकडून वर्क फ्रॉम होमची सुविधा कर्मचाऱ्यांना दिली जाते आहे. याचे अनेक फायदे असले, तरी काही तोटेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे पॉर्नच्या व्यसनाधीनतेत झालेली वाढ. इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे पॉर्नकडे लोक सहज ओढले जातात व व्यसन लागतं. याबाबतीतली यूकेमधील आकडेवारी सर्व काही स्पष्ट करते.