JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत

Chanakya Niti: शब्दांचा गोडवा, स्वभावात नम्रता बनवेल तुम्हाला श्रीमंत

जिभेवर कायम साखर ठेवली पाहिजे, हे आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनीसुद्धा सांगितलं आहे. तरच, सगळ्यांची मनं जिंकता येतात.

जाहिरात

वेळ बघून बोलणारी व्यक्ती विद्वान असते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली,17 जून : चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य **(Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये **(Difficult Time)**व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी **(Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)**येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही **(peaceful life)**जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. चाणक्य सांगतात प्रत्येक व्यक्तीने आपल्या सवयींचा गंभीरपणे विचार करायला हवा. आपल्या काही वाईट सवयी आपल्यासाठी संकटं उभी करत असतात. चांगल्या सवयींपेक्षा वाईट सवयी माणसाला लवकर आकर्षित करतात आणि त्यांच्यापासून पिच्छा सोडवणं कठीण असतं. आचार्य चाणक्य यांच्यामधते ज्याला चांगल्या सवयी असतात तोच माणूस आयुष्यामध्ये सन्मान आणि यश मिळवत असतो. शिवाय चांगल्या गुणांमुळे मिळालेले यश आणि सन्मान जास्त काळ टिकतो. तर, वाईट सवयी आपला सन्मान वाढवणाऱ्या असल्या तरीदेखील तो सन्मान जास्त काळ टिकत नाही. त्यामुळेच जास्तीत जास्त चांगले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. ( साप्ताहिक राशीभविष्य : कोणासाठी उत्तम, कोणासाठी अडचणीचा ठरणार हा आठवडा? ) आचार्य चाणक्य सांगतात चांगल्या सवयींनी आपलं मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं. याशिवाय आपली वागणूक चांगली असेल तर आपल्यावर नेहमी लक्ष्मीची कृपा राहते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या त्या चांगल्या सवयी जाणून घेऊयात. ( Chanakya Niti: ‘या’ 5 गोष्टी आहेत आर्थिक संकटाचे संकेत ) शब्दात **गोडवा आचार्य चाणक्य यांच्यामते बोलताना विचारपूर्वक बोलावं. आपल्या बोलण्याकडे आपणंच जास्त लक्ष दिले पाहिजे. गोड शब्दांनी सगळ्यांची मनं जिंकता येतात. यामुळेच लोकांमध्ये आपला सन्मान  वाढतो. कोणीही आपल्याशी वाईट वागलं तरी आपण त्याच्याशी गोड शब्दांमध्ये बोलायला पाहिजे. गोड बोलणाऱ्या व्यक्तीला लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. त्याउलट यांच्यामध्ये अहंकार असतो, जे लोक दुसऱ्यांची मनं दुखतात त्यांना कधीच सन्मान प्राप्त होत नाही. ( चांगला लीडर व्हायचंय? नेता होण्यासाठीचे 4 गुण चाणक्यांनी सांगितलेत ते पाहा ) विनम्रता आचार्य चाणक्य यांच्यामते स्वभावामध्ये विनम्रता असायला हवी. विनम्र माणसाचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर पडत असतो. त्यांची सोबत सगळ्यांना हवीहवीशी वाटते. विनम्र लोक सर्वांना आवडतात, अशा लोकांना शत्रूही कमी असतात. विनम्र लोकं आपली सगळी कामं यशस्वी करू शकतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या