चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.
दिल्ली,21 जून:चाणक्य **(**Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य **(**Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य **(**Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये **(Difficult Time)**व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी **(Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)**येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही **(peaceful life)**जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. ( या 3 राशी आहेत शनिदेवांना प्रिय, तरी सुरु आहे साडेसाती पहा तुमची रास आहे का? ) आचार्य चाणक्य सांगतात माणसांमध्ये थोडासाही अहंकार असेल तर त्याचा नाश होऊ शकतो. अहंकारात माणसाचा सन्मान आणि नाती जळून खाक होतात. पैसे आल्यानंतर लोकांमध्ये अहंकार देखील वाढायला लागतो. संपत्ती वाढली की अहंकारही येतो. आपल्या आजूबाजूलाच अशी अहंकाराने भरलेली अनेक लोकं असतात. बऱ्याचवेळा हा अहंकार नुकसान करत असून देखील स्वतः मधून बाहेर काढणे अशक्य होऊन जातं. ( Chanakya Niti: ‘या’ 3 गोष्टींमुळे कधीच मिळत नाही समाधान; सोडून द्या हव्यास ) अहंकाराचा अतिरेक झाला तर मग नाती देखील तुटायला लागतात. अगदी जवळच्या नात्यांमध्ये देखील गैरसमज निर्माण होतात. अहंकारामुळे भावंड, वडील, मित्र, नातलग सगळेच दूर व्हायला लागतात. ( ‘या’ 4 राशी असतात प्रचंड उधळ्या; कधीच टिकत नाही पैसा ) नात्यांमध्ये अहंकार शिरला की प्रेम संपून त्यामध्ये केवळ दुःखच उरतात. अहंकारी माणूस आयुष्यात शेवटी एकटाच राहतो. दुधामध्ये लिंबाचे थेंब पडल्यानंतर दूध नासतं आणि त्यातलं पाणी वेगळं दिसायला लागतं. त्याच प्रकारे अहंकार देखील आयुष्यामध्ये लिंबाचं काम करतो. ज्याच्या आयुष्यात हा अहंकार येतो त्याचं नाती संपतात.